PKL 2021-22: U Mumba vs UP Yodha: प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा यू मुंबा विरुद्ध यूपी योद्धा सामना ‘टाय’
PKL 2021-22 : प्रो कबड्डी लीगमध्ये (Pro kabbadi league) यू मुंबा विरुद्ध यू.पी.योद्धा बरोबरीत सुटला आहे.
बेंगळुरु: प्रो कबड्डी लीगमधील आजच्या दिवसातील पहिला सामना यू मुंबा विरुद्ध यू.पी.योद्धा बरोबरीत सुटला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी रेड आणि टॅकलमध्ये तोडीस तोड खेळ केला. यू मुंबाने टॅकल म्हणजे पकडीत यूपी योद्धापेक्षा थोडा सरस खेळ केला. दोन्ही टीम्सचे समसमान 28 पॉईंट झालेत. (Pro Kabaddi League PKL 2021 22 U Mumba UP Yodha match tie)
मुंबईकडून अजित कुमारने 6 रेडमध्ये नऊ पॉईंट मिळवले. अभिषेक आज विशेष प्रभाव पाडू शकला नाही. त्याने दोन रेडमध्ये चार पॉईंटस मिळवले. यूपी योद्धाकडून सुरींदर गिलने चांगली कामगिरी केली. त्याने आठ पॉईंटस मिळवले. त्याचवेळी सुमीतने टॅकलमध्ये जबरदस्त खेळ करत सहा गुण मिळवले. प्रदीप नरवाल पुन्हा एकदा फेल गेला. त्याला फक्त चार पॉईंटस मिळाले.
इतका मोठा स्टार खेळाडू चालत नसल्याने यूपीला स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. यूपी आणि मुंबाने प्रत्येकी तीन विजय मिळवले आहेत. मागच्या सामन्यात व्ही अजित कुमार आणि अभिषेक सिंहच्या दमदार खेळाच्या बळावर यू मुंबाने जयपूर पिंक पँथर्सवर 37-28 असा नऊ गुणांच्या फरकाने विजयाची नोंद केली होती.
संबंधित बातम्या:
Ravi Shastri| ‘चालू दे तुमचं’, रवी शास्त्रींनी सांगितला पंत-गिल बरोबरचा शौचालयातला ‘तो’ किस्सा IND vs SA: काल जंगी सेलिब्रेशन, आज वाँडरर्सवर टीम इंडियाने गाळला घाम Explained: परदेशात भारतीय गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीमागे ‘ही’ प्रमुख तीन कारणं
(Pro Kabaddi League PKL 2021 22 U Mumba UP Yodha match tie)