Girish Ernak| वर्तमानपत्र विकून प्रो कबड्डीपर्यंतचा प्रवास करणारा मराठमोळा गिरीश इर्नाक

कबड्डीसाठी सुद्धा डाएट फॉलो करावे लागते, पण ते सुद्धा गिरीशला त्यावेळी परवडणारे नव्हते. पण गिरीशने अपेक्षा सोडली नाही. त्याने मेहनत केली.

Girish Ernak| वर्तमानपत्र विकून प्रो कबड्डीपर्यंतचा प्रवास करणारा मराठमोळा गिरीश इर्नाक
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 7:50 AM

प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या मोसमापासून दमदार कामगिरी करणारा आणखी एक मराठमोळा चेहरा म्हणजे गिरीश मारुती इर्नाक. कबड्डीच्या कोर्टवर उतरल्यानंतर गिरीशच्या पकडीमधून सहसा कोणी सुटत नाही. काल जयपूर पिंक पँथर्स विरुद्धच्या सामन्यात गिरीशने अशाच दमदार पकडी केल्या. त्यामुळे गुजरातला जयपूरवर विजय मिळवता आला.

गिरीशचा जन्म 22 डिसेंबर 1992 मध्ये झाला. गिरीशमधली कबड्डीची प्रतिभा सर्वप्रथम त्याच्या पीटी शिक्षकांनी हेरली. त्यांनीच गिरीशला आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. शालेय जीवनापासून कबड्डी खेळायला सुरुवात करणाऱ्या गिरीशने नंतर कधी मागे वळून बघितले नाही.

कबड्डीची पार्श्वभूमी गिरीशला जेव्हा त्याच्या पीटी शिक्षकांनी आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले, त्यावेळी गिरीशसाठी हा खेळ पूर्णपणे नवीन होता. कबड्डीच्या तांत्रिक बाबी, नियमांबद्दल फारशी माहिती नव्हती. गिरीशच्या कबड्डीच्या शैलीने त्याच्या पीटी शिक्षकांना प्रोत्साहित केले.

कौटुंबीक पार्श्वभूमी गिरीश इर्नाक एका सामान्य कुटुंबातून येतो. त्याच्याकडे फारसा पैसा नव्हता. कबड्डीसाठी सुद्धा डाएट फॉलो करावे लागते, पण ते सुद्धा गिरीशला त्यावेळी परवडणारे नव्हते. पण गिरीशने अपेक्षा सोडली नाही. त्याने मेहनत केली. गिरीशने सकाळच्यावेळी वर्तमानपत्र वितरणाचं काम केलं व तेच पैसे डाएटसाठी खर्च केले. पहिल्या हंगामापासून गिरीश प्रो कबड्डी लीगशी जोडलेला आहे. वेगवेगळ्या संघाकडून तो खेळत आलाय.

प्रो कबड्डी लीगमधला गिरीशचा प्रवास 2014 – पटना पायरेटस 2015- पटना पायरेटस 2016- बंगाल वॉरिअर्स 2017- पुणेरी पलटन 2018- पुणेरी पलटन 2019- पुणेरी पलटन 2021 – गुजरात जायंटस

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.