Syed Modi Tournament : अंतिम फेरीत मालविका बनसोड पराभूत, खिताब पीव्ही सिंधूच्या नावावर
भारताची दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधूने (PV Sindhu) BWF सुपर 350 सय्यद मोदी (Syed Modi Tournament) स्पर्धा जिंकली आहे. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सिंधूने युवा स्टार मालविका बनसोडचा (Malvika Bansod) अवघ्या 35 मिनिटांत पराभव केला.
मुंबई : भारताची दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधूने (PV Sindhu) BWF सुपर 350 सय्यद मोदी (Syed Modi Tournament) स्पर्धा जिंकली आहे. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सिंधूने युवा स्टार मालविका बनसोडचा (Malvika Bansod) अवघ्या 35 मिनिटांत पराभव केला. सिंधूने 21-13, 21-16 अशा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. माजी विश्वविजेत्या सिंधूचे सय्यद मोदी स्पर्धेतील हे दुसरे विजेतेपद आहे. यापूर्वी 2017 मध्येही तिने या BWF वर्ल्ड टूर सुपर 300 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.
यापूर्वी मालविकाने तीन गेमपर्यंत चाललेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अनुपमा उपाध्यायचा 19-21, 21-19, 21-7 असा पराभव केला होता. दुसरीकडे, सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत पीव्ही सिंधूची लढत पाचवी मानांकित रशियन प्रतिस्पर्धी इव्हजेनिया कोसेत्स्काया हिच्यासोबत होती. मात्र इव्हजेनियाला उपांत्य फेरीत दुखापत झाली होती. त्यामुळे सिंधूला अंतिम फेरीचं तिकीट मिळालं. उपांत्य फेरीत अव्वल मानांकित सिंधूने पहिला गेम 21-11 असा सहज जिंकल्यानंतर, कोसेत्स्कायाने दुखापतीच्या कारणास्तव रिटायर्ड हर्ट होऊन माघार घेण्याचे ठरवले होते.
मिश्र दुहेरीचं विजेतेपद ईशान भटनागर आणि तनिषाने पटकावलं
इशान भटनागर आणि तनिषा क्रास्टो या भारतीय जोडीने रविवारी भारतीय जोडी टी. हेमा नागेंद्र बाबू आणि श्रीवेद्या गुराझादा यांचा सरळ सेटमध्ये पराभव करून सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले. इशान आणि तनिषाने अवघ्या 29 मिनिटांत बिगरमानांकित भारतीय जोडीविरुद्ध 21-16, 21-12 असा विजय नोंदवला.
Congratulations to @Pvsindhu1 for clinching Syed Modi International women’s singles title in badminton.
Also appreciate & congratulate the budding champion Malvika Bansod,a 2nd yr SRM College Student for being the runner-up in the finals held in Lucknow today. pic.twitter.com/MCxVCnK1N4
— Dr Tamilisai Soundararajan (@DrTamilisaiGuv) January 23, 2022
कोरोनामुळे पुरुष दुहेरीचे सामने झाले नाहीत
तत्पूर्वी, अर्नाड मर्कल आणि लुकास क्लेअरबाउट यांच्यातील पुरुष एकेरीच्या विजेतेपदाचा सामना कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्यानंतर ‘नो मॅच’ म्हणून घोषित करण्यात आला होता. अंतिम फेरीतील एकाची कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली होती. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने एका निवेदनात म्हटले आहे की, “सय्यद मोदी इंडिया इंटरनॅशनल 2022 च्या पुरुष एकेरी फायनलला ‘नो मॅच’ घोषित करण्यात आले आहे. BWF ने पुष्टी केली की, अंतिम फेरीत पोहोचलेल्या एका खेळाडूची आज सकाळी COVID-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
दुसरा अंतिम स्पर्धक देखील त्याच्या संपर्कात आला होता, त्यामुळे हा सामना होऊ शकला नाही. असे निवेदनात म्हटले आहे. विजेत्याची माहिती, जागतिक क्रमवारीतील गुण आणि बक्षिसाची रक्कम आगामी काळात उघड केली जाईल.
इतर बातम्या
वनडे मध्ये भारतापेक्षा झिम्बाब्वे आणि स्कॉटलंडची चांगली गोलंदाजी, विश्वास नसेल तर हे आकडे पाहा
ICC U19 World Cup: युगांडावरील मोठ्या विजयानंतर क्वार्टर फायनलमध्ये भारत बांगलादेशसोबत भिडणार
hoaib Akhtar: ‘विराट कोहलीला कॅप्टनशिप सोडायला भाग पाडलं’, शोएब अख्तरचा खळबळजनक दावा
(PV Sindhu wins Syed Modi International title, defeats Malvika Bansod)