Sharad Pawar : कुस्तिगीर संघटनेची मान्यता परत मिळवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करू: शरद पवार

Sharad Pawar : राज्यात अनेक खेळाच्या संस्था आहेत. मी अनेक वर्षापासून त्या संघटनांचा अध्यक्ष आहे. मी क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष होतो. मुंबई, देशाचा, मुंबईचा आणि जगाचा होतो. खेळाच्या संघटनेत खेळाच्या निवडीत मी लक्ष घालत नसे.

Sharad Pawar : कुस्तिगीर संघटनेची मान्यता परत मिळवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करू: शरद पवार
संभाजीनगर नामांतरावर काय म्हणाले पवारImage Credit source: ani
Follow us
| Updated on: Jul 02, 2022 | 3:14 PM

मुंबई: महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद  (Maharashtra State Wrestling) बरखास्त करण्यात आली आहे. संघटनेच्या विरोधात तक्रारी आल्यानंतर भारतीय कुस्ती संघटनेने (indian wrestling association) हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) हे महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे पवारांसाठी हा धक्का मानला जात आहे. या सर्व प्रकरणावर शरद पवार यांनी स्वत: प्रतिक्रिया व्यक्त केली असून नेमकं काय झालं याची माहिती दिली आहे. तसेच कुस्तिगीर संघटनेची मान्यता परत मिळवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पुढच्या आठवड्यात मी दिल्लीला जाणार आहे. त्यावळे भारतीय कुस्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन काय चुका झाल्या त्या समजून घेऊ. संघटनेने सूचवलेल्या सुधारणा करू आणि राज्य कुस्तिगीर संघटनेची मान्यता परत मिळवू, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. ते टीव्ही9 मराठीशी संवाद साधत होते.

राज्यात अनेक खेळाच्या संस्था आहेत. मी अनेक वर्षापासून त्या संघटनांचा अध्यक्ष आहे. मी क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष होतो. मुंबई, देशाचा, मुंबईचा आणि जगाचा होतो. खेळाच्या संघटनेत खेळाच्या निवडीत मी लक्ष घालत नसे. त्या क्षेत्रातील जाणकारांनी काम पाहावं, अशी माझी सातत्याने भूमिका राहिली आहे. संघटनांना काही अडचणी आल्या, शासकीय मदतची गरज भासली तर मी मदत करायचो. कुस्तगीर परिषद याला अपवाद नाही. कुस्तिगीर परिषदेचा अध्यक्ष म्हणून मी काम करत होतो. स्पर्धांना आर्थिक मदत देण्याचं काम मी करत होतो. अलिकडे कुस्तिगीर संघाच्या कामाबद्दल तक्रारी येत होत्या. पुण्यातील संघाच्या तक्रारी गंभीर होत्या. लांडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मी बोलून सांगितलं होतं. मी त्यांना सुधारणा करण्यास सांगितल्या होत्या, असं शरद पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रीय संघटना मदत करतील

पुण्यातील माजी हिंद केसरी काका पवार यांनीही याबाबतच्या तक्रारी केल्या होत्या. ते आजही अनेक तरुणांना तयार करतात. त्यांच्या तालमीत 80 ते 90 मुलं ते तयार होत असतात. आम्ही या तरुणांना मदत करत असतो. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर हे तरुण चमकावेत म्हणून आमचा त्यांना मदतीचा हात असतो. अलिकडे लांडगे यांच्या बाबत तक्रारी होत्या. त्यामुळे तीन ते चार आठवड्यापूर्वी मी त्यांना बोलून सांगितलं होतं. सुधारणा करा. अखिल भारतीय कुस्तिगीर संघटनेकडे तक्रारी गेल्या आहेत. त्या स्ट्राँग अॅक्शन घेतील, असं मी त्यांना कल्पना दिली होती. मलाही कारवाई होईल असं वाटत होतं. पण अॅक्शन चांगली झाली नाही. त्यातून मार्ग काढावा लागेल. कुस्तिगीरांना अन्य ठिकाणी सहभागी होण्यास अडचणीत येतील. मी दि्ललीत कुस्तिगीर संघटनेच्या अध्यक्षांना भेटणार आहे. त्यांना दुरुस्त्या करायला लावू आणि संघटनेची मान्यता कायम राहील याची काळजी घेऊ. आम्हाला राष्ट्रीय संघटना मदत करतील असा विश्वास आहे, असं पपवार म्हणाले.

राज्यातील राजकारणाशी संबंध नाही

राज्यातील राजकारणाचा आणि या कारवाईचा काही संबंध आहे का? असा सवाल पवार यांनना करण्यात आला. त्यावर, छे छे खेळाच्या संघटनेत आम्ही कधी राजकारण आणत नाही. राजकारणाचा संबंध नाही. या संघटनेत अनेक पक्षाचे लोक होते. मुंबई क्रिकेटमध्ये मी होतो. माझ्यानंतर अध्यक्ष झालेले शेलार भाजपमध्ये होते. आज उद्या ते मंत्री होतील. आम्ही एका विचाराने कामे करतो. कधी आमच्या निर्णयात मतदानही होत नाही. कारण क्रीडा संघटनेत आम्ही राजकारण आणत नाही. आमच्याकडून कुस्तिगीर संघटनेत सुधारण्यात विलंब झाला. त्यात सुधारणा करता आली असती. पण केली नाही. पण यात राजकारण नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाचा याच्याशी काहीच संबंध नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राजकीय पक्षांचा सबंध नाही

इथे पक्ष नाही. क्रीडा क्षेत्रात काम करणारे जे घटक आहेत. ते आहेत. राजकीय पक्षाचा काही संबंध नाही. क्रीडा संघटनात काही मतभेद असतील तर ते दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करणं. याची आम्ही काळजी घेत आहोत. इथे कोणताही राजकीय पक्ष किंवा त्याला असोसिएट करणं हा विषयही मनात नाहीये, असंही त्यांनी सांगितलं.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.