आईने शिवणकाम करुन वाढवलं, मुलीने विनाचप्पल स्पर्धा गाजवल्या, शैली सिंहच्या मेहनतीला देशाचा सलाम

अंडर - 20 जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताची महिला लांब उडी खेळाडू शैली सिंहने (Shaili Singh) रविवारी (U-20 World Athletics Championship) अंतिम फेरीत रौप्य पदक पटकावले आहे.

आईने शिवणकाम करुन वाढवलं, मुलीने विनाचप्पल स्पर्धा गाजवल्या, शैली सिंहच्या मेहनतीला देशाचा सलाम
शैली सिंह
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 3:19 PM

नैरोबी : भारताची महिला लांब उडी खेळाडू शैली सिंहने (Shaili Singh) रविवारी अंडर – 20 जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या (U-20 World Athletics Championship) अंतिम फेरीत घेतलेल्या उडीने भारताला थेट रौप्य पदक मिळवून दिले. तब्बल 6.59 मीटर दूर उडी टाकत शैलीने ही कामगिरी केली. भारताला रौप्य पदक मिळवून देत 17 वर्षीय शैलीने इतिहास रचला. मूळची झाशी येथील असणाऱ्या शैलीने या विजयासोबत सर्व भारतीयांना आनंदी केलं आहे. विशेष म्हणजे दिग्गज खेळाडू अंजू बॉबी जॉर्जचं स्वप्नही शैलीने पूर्ण केलं असून ती मागील बऱ्याच काळापासून तिच्या अकादमीत प्रशिक्षण घेत होती. ही रुपेरी कामगिरी करणारी शैली मूळात एका गरीब कुटुंबातून आली आहे.

शैलीला वडिल नसल्याने केवळ आईने तिचा सांभाळ शिवणकाम करुन केला आहे. शैलीच्या आईने तीन भावडांचा सांभाळ करताना खूप कष्ट घेतले आहेत. शैलीने देखील आहे त्या परिस्थितीत मेहनत घेत अगदी विनाचप्पल शालेय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. शूज घेण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने शैली विनाचप्पल स्पर्धांमध्ये भाग घेत असली तरी मेहनत आणि खेळाच्या जोरावर तिने कायमच उत्तम कामगिरी केली आहे.

आधी रॉबर्ट जॉर्जचं मन जिंकल!

शैली चार वर्षांपूर्वी विजयवाडा येथे झालेल्या जूनियर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये पाचव्या स्थानावर राहिली. यावेळी तिने पदक जिंकलं नाही, मात्र उत्कृष्ट खेळामुळे रॉबर्ट जॉर्ज यांच मनं जिंकलं. ज्यामुळे त्यांनी त्यांची पत्नी आणि दिग्गज खेळाडू अंजू बॉबी जॉर्ज यांच्या अकादमीत शैलीची ट्रेनिंग सुरु केली. बंगळुरू य़ेथे शैली सराव करु लागली. रॉबर्ट जॉर्ज आणि अंजू यांनी शैलीला ट्रेन करण्यास सुरुवात करताच तिच्या खेळात आणखी सुधार आला. तिने अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकं मिळवली. ज्यानंतर आता आंतरराष्ट्रीय दर्जावर अंडर – 20 जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौैप्यपदक मिळवत इतिहास रचला आहे.

आणि तिला रडू कोसळलं

स्पर्धेत दुसऱ्या प्रयत्नातील उडी मारल्यानंतर शैली पहिल्या स्थानावर होती, मात्र स्वीडनच्या अक्सागने तिच्यापेक्षा एक सेंटीमीटर लांब उडी मारून तिला दुसऱ्या स्थानावर ढकलले आणि सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे सुवर्णपदक अगदी थोडक्यात हुकल्याने शैली खूप निराश झाली होती. ज्यामुळे स्पर्धा होताच तिला रडू आलं. दरम्यान तिचे प्रशिक्षक अंजू आणि रॉबर्ट यांना विश्वास आहे की, भविष्यात शैली अप्रतिम कामगिरी करुन नक्कीच भारताला आणखी पदकं मिळवून देईल.

इतर बातम्या

U-20 World Athletics : भारताच्या शैली सिंहला लांब उडीत रौप्य, छोट्याशा फरकाने सुवर्णपदकाची हुलकावणी

तालिबानकडून अफगाणिस्तान क्रिकेट संघाबाबत मोठं वक्तव्य, क्रिकेट संघाच्या कर्णधाराची तालिबान अधिकाऱ्यांनी घेतली भेट, म्हणाले…

(Single mother Daughter shaili singh Won silver medal for india U-20 World Athletics)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.