Euro CUP 2020 : स्पेन संघाची बचावात्मक सुरुवात, स्वीडन विरुद्धचा सामना अनिर्णीत

जागतिक फुटबॉलमधील एक बलाढ्या संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्पेन संघाची युरो चषक स्पर्धेतील सुरुवात अनिर्णीत सामन्याने झाली आहे. स्वीडन विरुद्धचा सामन्यात दोन्ही संघाना एकही गोल करता आला नाही.

Euro CUP 2020 : स्पेन संघाची बचावात्मक सुरुवात, स्वीडन विरुद्धचा सामना अनिर्णीत
स्पेन आणि स्वीडन यांच्यातील सामन्यातील एक क्षण
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 1:58 PM

सेविला : कोरोनाच्या भयंकर लाटेचा सामना केलेल्या स्पेनच्या संघाने (Spain) युरो चषकातील (Euro Cup 2020) पहिल्या सामन्यात दिलासादायक कामगिरी केली. स्वीडन विरोधातील (Sweden) सामन्यात स्पेनला एकही गोल करता आला नाही. मात्र त्यांनी स्वीडनलाही गोल करु न दिल्याने सामना 0-0 ने अनिर्णीत सुटला. (Spain vs Sweden Match Draw in Euro 2020)

सामन्यात स्पेनचे वर्चस्व

स्पेन आणि स्वीडन यांच्यातील सामन्यात अधिक काळ बॉल हा स्पेनच्या खेळाडूंकडे होता. त्यामुळे पजेशनचा विचार करता स्पेन सरस ठरले. सामन्यात स्पेनचा स्टार खेळाडू एलवारो मोराटाने (Álvaro Morata) अप्रतिम खेळ दाखवला. त्याने एक अप्रतिम प्रयत्न देखील केला पण बॉल थोडासा बाजूला गेल्याने गोल होऊ शकला नाही. स्वीडन संघाच्या खेळाडूने केलेल्या उत्कृष्ट डिफेन्डीगमुळे स्पेनला अनेक प्रयत्नानंतरही गोल करता आला नाही ज्यामुळे सामना गोलरहित सुटला.

स्कॉटलंडची झुंज अयशस्वी

स्पेन आणि स्वीडनसह सोमवारी स्कॉटलंड आणि चेक रिपब्लिक यांच्यातही सामना खेळवला गेला. स्कॉटलंड संघाने सुरुवातीला काही अॅटॅक देखील केले. पण चेक रिपब्लिकचा गोलकीपर टोमाष वातश्लिकने अप्रतिम सेव्ह करत एकही गोल होऊ दिला नाही. त्यानंतर हाल्फ टाईम व्हायला 3 मिनिटं शिल्लक असताना 42 व्या मिनिटाला चेकच्या व्लादिमिर कुफॉलच्या अप्रतिम क्रॉसवर शिकने हेडरद्वारे सुंदर गोल करत सामन्यात 1-0 ची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या हाल्फमध्ये पुन्हा चेकच्या शिक याने स्पर्धेतील आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट गोलची नोंद केली. 52 व्या मिनिटाला मैदानाच्या मध्यातून शिकने अप्रतिम किक मारत थेट गोल पोस्टमध्ये बॉलला पोहचवलं. दोन गोल्सच्या जोरावर सामना 2-0 ने चेक रिपब्लिकच्या खिशात गेला.

स्लोवाकिया संघाची दमदार सुरुवात

रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग मैदानात सोमवारच्या दिवसातील दुसरा सामना खेळवला गेला. यात बलाढ्य पोलंड संघाला स्लोवाकियाने मजबूत टक्कर देत 2-1 ने सामन्यात विजय मिळवला. सामन्याच्या 18 व्या मिनिटाला स्लोवाकियाच्या रॉबर्ट मॅकने पोलंडच्या डिफेन्डर्सना चकवत एक उत्कृष्ट शॉट घेतला. परंतू बॉल गोलपोस्टला लागून पोलंडच्या गोलकीपर वॉयचेख शचेनस्नीच्या (Wojciech Szczęsny) डोक्याला लागून गोलच्या आत गेला. ज्यामुळे स्लोवाकिया संघाला 1-0 ची आघाडी मिळाली. युरो चषकाच्या इतिहासात गोलकीपरद्वारा केला गेलेला हा पहिला आत्मघातकी गोल ठरला. सामन्यात एका गोलने पिछाडीवर असलेल्या पोलंडने दुसऱ्या हाल्फच्या पहिल्याच मिनिटात गोल करत सामन्यात बरोबरी साधली. मिडफील्डर कॅरोल लिनेटीने हा गोल केला. ज्यानंतर 69 व्या मिनिटाला पुन्हा एकदा स्लोवाकियाला मिळालेल्या कॉर्नरच्या मदतीने मिलान स्क्रिनीअरने गोल करत पुन्हा एकदा आघाडी मिळवली, हा गोल सामन्यात निर्णायक ठरला आणि सामन्यात स्लोवाकियाने 2-1 ने विजय मिळवला.

हे ही वाचा :

Euro 2020 : चेक रिपब्लिकचा स्कॉटलंडवर विजय, स्लोवाकियाचीही विजयी सुरुवात

Euro 2020 : इंग्लंडची क्रोएशियावर मात, ऑस्ट्रियाचाही जबरदस्त विजय

Euro 2020: फिनलँडचा ऐतिहासिक विजय, वेल्स आणि स्वित्झर्लंडमधील सामना अनिर्णीत, बेल्जियमची रशियावर मात

(Spain vs Sweden Match Draw in Euro 2020)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.