चक दे इंडिया… तरुण फुटबॉलपटूंचं स्वप्न पूर्ण होणार, Indian Tigers & Tigresses Talent Huntचे महाआर्यमन सिंधिया ब्रँड ॲम्बेसेडर

बुंदेसलीगा आणि DFB-Pokal च्या सहकार्याने टीव्ही9 नेटवर्कने The Indian Tigers and Tigresses Talent Hunt ही अभूतपूर्व मोहीम हाती घेतली आहे. भारतातील प्रतिभावंत युवा खेळाडूंना शोधून काढणे त्यांना संधी देणे हा आहे. या कार्यक्रमांतर्गत 20 मुलं आणि 20 मुलींची निवड केली जाणार आहे. त्यांना जर्मनी आणि ऑस्ट्रियामध्ये प्रोफेशनल ट्रेनिंग दिली जाणार आहे. महाआर्यमन सिंधिया या मोहिमेत ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून सहभागी झाले आहेत.

चक दे इंडिया... तरुण फुटबॉलपटूंचं स्वप्न पूर्ण होणार, Indian Tigers & Tigresses Talent Huntचे महाआर्यमन सिंधिया ब्रँड ॲम्बेसेडर
mahanaaryaman scindiaImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 10, 2024 | 3:34 PM

टीव्ही9 नेटवर्कने एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. टीव्ही9 नेटवर्कने सुरू केलेल्या Indian Tigers and Tigresses Talent Hunt मोहिमेत महाआर्यमन सिंधिया ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून सामील होत असल्याची घोषणा टीव्ही9 नेटवर्कने केली आहे. महानारायण सिंधिया ब्रँड ॲम्बेसेडर झाल्याने या अनोख्या टॅलेंट हंटला आता विशाल स्वरुप मिळणार आहे. कारण भारत आता आपलं फुटबॉलचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Indian Tigers and Tigresses मोहीम ही एका टॅलेंट हंटपेक्षाही अधिक आहे. भारतातील फुटबॉलची दिशा बदलण्यासाठीची ही मोहीम आहे. बुंदेसलीगा, DFB-Pokal आणि सन्मानित यूरोपीय संघटनांसोबत भागिदारीत हा कार्यक्रम तरुण फुटबॉलर्ससाठी एक अद्वितीय संधी देणार आहे.

या कार्यक्रमाद्वारे 20 मुली आणि 20 मुलांची निवड केली जाणरा आहे. त्यांना जर्मनी आणि ऑस्ट्रेलियात प्रोफेशनल ट्रेनिंग देण्यात येणार आहे. हे प्रतिभावंत खेळाडू यूरोपीयन क्लबच्या विरोधात स्पर्धेत उतरतील. त्यामुळे या तरुणांना अमूल्य अनुभव मिळणार आहे. नोव्हेंबरमध्ये या अनुभवी अॅथलिटचा एका आंतरराष्ट्रीय मंचावर त्यांच्या कामगिरीबाबत गौरव केला जाणार आहे.

महाआर्यमन सिंधिया हे फुटबॉल आणि तरुणांच्या विकासाबाबत अत्यंत आग्रही आणि उत्साही आहेत. त्यामुळे त्यांचं ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांच्या सहभागामुळे केवळ प्रतिभावंतांचाच शोध घेतला जाणार नाही तर त्या प्रतिभावंतांना आकार देण्यासही फायदा होणार आहे. महाआर्यमन सिंधिया यांच्यामुळे हे मिशन अधिक मजबूत होणार आहे. त्यामुळे भारतीय फुटबॉलचा मार्ग अजून प्रशस्त होणार आहे.

महाआर्यमन सिंधिया यांनी याबाबतचं आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. फुटबॉल माझ्या हृदयात आहे. आपल्या देशात प्रचंड क्षमता आहे, हे मी पाहिलं आहे. इंडियन टायगर्स आणि टायग्रेसेस या कार्यक्रमाने तरुण खेळाडूंना फुटबॉल विश्वाचे दरवाजे उघडून दिले आहेत. मी या मोहिमेचा भाग झाल्याने अत्यंत उत्साहीत झालो आहे, असं महाआर्यमन सिंधिया म्हणाले. केवळ लहान मुलांना एक व्यासपीठ निर्माण व्हावं हा केवळ या मंचाचा उद्देश नाहीये, तर या तरुणांना वैश्विक स्तरावर यशस्वी होण्यासाठी साहित्य आणि संधी देण्याचा उद्देश या टॅलंट हंट मोहिमेचा आहे, असंही सिंधिया यांनी सांगितलं.

माझा पर्सनल प्रोजेक्ट : बरुण दास

टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ श्री. बरुण दास यांनीही सिंधिया यांच्या या म्हणण्याला दुजोरा दिला आहे. आम्ही सामाजिक उत्प्रेरक आहोत. आम्ही ‘ग्रेट इंडियन फुटबॉल ड्रीम’ला समर्थन देण्यासाठी वचनबद्ध आहोत. ‘इंडियन टायगर्स आणि टायग्रेसेस’ हा माझ्यासाठी खूपच वैयक्तिक प्रकल्प आहेय. या मोहिमेचा उद्देश असामान्य तरुण फुटबॉल खेळाडूंना प्रकाशात आणणं हा आहे आणि त्यांना संधी देऊन त्यांचं पोषण करणं आहे. महानारायमन सिंधिया यांच्या कार्यक्रमाशी असलेल्या संबंधामुळे भारतीय फुटबॉलच्या भविष्यावर अर्थपूर्ण प्रभाव पाडण्याची आमची क्षमता वाढेल, कारण त्यांचा तरुणांशी विशेष संपर्क आहे, असं टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ श्री. बरुण दास यांनी सांगितलं.

mahanaaryaman scindia

mahanaaryaman scindia

वैश्विक मीडियाचे संचालक, DFB (जर्मन फुटबॉल असोसिएशन) Kay Dommholz ने महाआर्यमन सिंधिया यांचे टीव्ही9 नेटवर्कच्या सर्वात मोठ्या टॅलेंट हंटमध्ये सहभागी झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. त्यांनी सिंधिया यांना जर्मन फुटबॉल टीमचे सामने पाहण्यासाठी जर्मनीत येण्याचं निमंत्रणही दिलं आहे.

बोरुसिया डोर्टमुंडचे आशिया पॅसिफिक प्रमुख जुलिया फर आणि REISPOचे मुख्य कार्यकारी अधिकारी गेरहार्ड रीडल यांनीही सिंधिया यांचं स्वागत केलं आहे. सिंधिया हे सध्या सुरू असलेल्या फुटबॉल टॅलेंट हंटमध्ये नवीन गतिशिलता आणतील, अशी आशा Julia Farr यांनी व्यक्त केली आहे.

इंडियन टायगर्स आणि टायग्रेस टॅलेंट हंटला भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. एक मजबूत प्रतिभावंतांची फळी उभी केली जाईल हा त्यामागचा हेतू आहे. 100,000 शाळांपर्यंत पोहोचण्यासोबतच विविध पार्श्वभूमीमधून कच्ची प्रतिभा हेरण्याचा आणि त्यांना संधी देण्याचा या मागचा उद्देश आहे. उच्च दर्जाचे प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शन प्रदान करून, भारतात सर्वोत्तम फुटबॉलचं नवीन युग निर्माण करण्यासाठी तयार आहे.

mahanaaryaman scindia

mahanaaryaman scindia

हा उपक्रम केवळ प्रतिभेचा शोधण्याचाच नाहीये, तर भारतातील फुटबॉलच्या परिस्थितीला प्रेरणा देण्यासाठी आणि भारतातील फुटबॉल उंचावण्यसााठी एक लाट निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. भारतीय प्रतिभेला जागतिक प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करून, आम्ही फुटबॉलबद्दल उत्साह निर्माण करण्याची आणि सर्व पातळ्यांवर खेळाच्या विकासाला चालना देण्याची आशा करत आहोत.

अधिक माहितीसाठी आणि या उपक्रमात सहभागी होण्यासाठी www.indiantigersandtigresses.com या संकेतस्थळाला भेट द्या.

Non Stop LIVE Update
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?.
सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, 'गरज पडल्यास..'
सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, 'गरज पडल्यास..'.
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला.
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी.
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?.
पोल ऑफ पोल, मतदानानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार? कोणाचा अंदाज काय?
पोल ऑफ पोल, मतदानानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार? कोणाचा अंदाज काय?.
राज्यात महायुती-मविआत काँटे की टक्कर, 'लोकशाही रुद्र'चा एक्झिट पोल काय
राज्यात महायुती-मविआत काँटे की टक्कर, 'लोकशाही रुद्र'चा एक्झिट पोल काय.
राज्यात 'मविआ'ची सत्ता? कोणाला किती जागा? tv9 रिपोर्टर पोलचा अंदाज काय
राज्यात 'मविआ'ची सत्ता? कोणाला किती जागा? tv9 रिपोर्टर पोलचा अंदाज काय.