Euro 2020 : बाद फेरीचे सामने संपले, आता 8 अंतिम संघामध्ये रंगणार युद्ध, वाचा उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक

युरोपियन देशात सुरु असलेली युरो चषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहचली असून सर्व बाद फेरीचे सामने संपले आहेत. त्यामुळे आता उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना सुरुवात होणार असून यंदा बरेच नवे संघ जे मागील बरेच वर्ष उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचले नव्हते ते पोहोचले असल्याने स्पर्धा पाहण्याची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Euro 2020 : बाद फेरीचे सामने संपले, आता 8 अंतिम संघामध्ये रंगणार युद्ध, वाचा उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक
Uefa euro cup 2020
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 11:36 AM

कोबेनहवन : युरोपियन देशांत सर्वांत मानाची फुटबॉल स्पर्धा म्हटलं तर युरो चषक (Euro Cup 2020). यंदाचा युरो चषकही दरवर्षीप्रमाणे चुरशीचा होत असून अनेक अनपेक्षित असे रिझल्ट समोर आले आहेत. शेवटच्या मिनिटांमध्ये गोल, पेनल्टी शूटआऊट, अतिरिक्त वेळेत गोल अशा रिझल्ट्समुळे यंदा बऱ्याच मातब्बर संघाना उपांत्यपूर्व फेरी आधीच स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. सध्या बाद फेरीचे सामने संपले असून अंतिम 8 संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. (UEFA Euro 2020 Round 16 Matches Over Now Quarter Final Matches Will Start Read Full Schedule of Euro Cup)

बाद फेरीच्या सामन्यात गतविजेते पोर्तुगाल, विश्वविजेते,  फ्रान्स, जर्मनी अशा दिग्गज संघाना पराभवाचा सामना करावा लागला असून युक्रेन, स्वित्झर्लंडसारखे संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. दरम्यान या सर्व बाद फेरीच्या सामन्यातील सर्वात रोमहर्षक आणि धक्कादायक सामना म्हणजे फ्रान्स आणि स्वित्झर्लंड यांच्यातील विश्वविजेचत्या फ्रान्सला स्वित्झर्लंडने पेनल्टी शूटआऊटमध्ये मात दिली. 5-4 च्या फरकाने पेनल्टी शूटआऊट जिंकत फ्रान्सने सामना आपल्या नावे करत उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवली. तसेच चेक रिपब्लिक संघाने देखील नेदरलँडला 2-0 च्या फरकाने धक्कादायक मात दिली. रोनाल्डो कर्णधार असलेल्या पोर्तुगाल संघाला देखील बेल्जियमने चुरशीच्या सामन्यात मात दिली ज्यामध्ये पोर्तुगालने 23 वेळा प्रयत्न करुनही त्यांना एक देखील गोल करता आला नाही.

उपांत्य पूर्व फेरीचे वेळापत्रक

बाद फेरीत 16 संघामधून 8 संघ स्पर्धेबाहेर तर उर्वरीत 8 संघ उपांत्य पूर्व फेरीत पोहोचले आहेत. आता या 8 संघात 2 जुलैपासून उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. ज्यामध्ये 3 जुलैला इटली आणि बेल्जियम यांच्यातील सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कारण या दोन्ही संघाना विजयाचे दावेदार मानलं जात असल्याने कोणतातरी एक संघ या सामन्यानंतर स्पर्धेबाहेर जाणार आहे.

जुलै

स्वित्झर्लंड vs स्पेन

9.30pm

सेंट पीटर्सबर्ग

जुलै

बेल्जियम vs इटली

12.30 am

म्यूनिख

जुलै

चेक रिपब्लिक vs डेन्मार्क

9.30pm

बाकू

जुलै

युक्रेन vs इंग्लंड

12.30am

रोम

हे ही वाचा :

Euro 2020 : रोमहर्षक सामन्यात स्पेनचा विजय, क्रोएशियाला नमवत नवा रेकॉर्डही केला नावे

Euro 2020 : रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ पराभूत, स्पर्धेतून बाहेर, मैदानावर रोनाल्डोसह प्रतिस्पर्धीही भावूक

Euro 2020 : रोनाल्डो ठरला Successful, एकाच सामन्यात चार दमदार विक्रम नावावर

(UEFA Euro 2020 Round 16 Matches Over Now Quarter Final Matches Will Start Read Full Schedule of Euro Cup)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.