Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinesh Phogat retires: “कुश्ती मेरे से जीत गई मैं हार गई”…, भावनिक टि्वट करत विनेश फोगाटचा कुस्तीतून संन्यास

Vinesh Phogat retires: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये घडलेल्या प्रकारमुळे विनेश खूप दु:ख झाल्याचे तिच्या ट्विटवरून स्पष्ट झाले आहे. यामुळे तिने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. विनेशने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कुस्तीचे प्रदर्शन करून महिलांच्या ५० किलो गटाच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते.

Vinesh Phogat retires: कुश्ती मेरे से जीत गई मैं हार गई..., भावनिक टि्वट करत विनेश फोगाटचा कुस्तीतून संन्यास
Vinesh Phogat disqualified
Follow us
| Updated on: Aug 08, 2024 | 7:34 AM

भारताची महिला कुस्तापटू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये घडलेल्या प्रकारानंतर निराश झाली आहे. तिने कुस्तीतून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. भावनिक ट्विट करत तिने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. “आई, कुस्ती माझ्याकडून जिंकली, मी हरली, माफ करा, तुझे स्वप्न, माझे धैर्य सर्व तुटले आहे. माझ्याकडे यापेक्षा जास्त ताकद नाही. अलविदा कुस्ती…असे लिहित विनेश फोगाट हिने देशवासियांची माफी मागितली आणि म्हणाली की मी तुमच्या सर्वांची नेहमीच ऋणी राहीन.” विनेश फोगाटने उपांत्य फेरीचा सामना 5-0 च्या फरकाने जिंकला आणि ऑलिम्पिक अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती. परंतु शंभर ग्रॅम वजन जास्त झाल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आले.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये घडलेल्या प्रकारमुळे विनेश खूप दु:ख झाल्याचे तिच्या ट्विटवरून स्पष्ट झाले आहे. यामुळे तिने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. विनेशने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कुस्तीचे प्रदर्शन करून महिलांच्या ५० किलो गटाच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. ऑलिम्पिक फायनलमध्ये खेळणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती. पण, फायनलच्या काही तास आधी तिच्यावर ५० किलोपेक्षा शंभर ग्रम तिचे वजन जास्त भरले. त्यामुळे तिला अपात्र घोषित करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

पदक जिंकण्याचे स्वप्न

एक दशकाहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय कुस्ती मॅटवर सक्रिय असलेल्या विनेश फोगटने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न पाहिले होते. त्याच्या आईचेही हेच स्वप्न होते. पण, सलग तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊनही विनेश पदकापर्यंत पोहचली. परंतु तिला पदक मिळाले नाही.

2016 मध्ये ऑलिम्पिक पदार्पण

विनेशने रिओ 2016 मध्ये ऑलिम्पिक पदार्पण केले होते. परंतु त्यावर्षी तिला दुखापतीमुळे बाहेर पडावे लागले होते. त्यानंतर विनेश फोगटचा टोकियो ऑलिम्पिकमधील प्रवास उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नवा इतिहास रचण्यापासून ती फक्त एक पाऊल दूर असताना तिला अपात्र ठरवण्याच्या निर्णयाने केवळ तिचीच नव्हे तर संपूर्ण भारतीयांना दु:ख झाले आहे.

हे ही वाचा…

ऑलिम्पिकमध्ये एक ग्रॅम जास्त वजन चालत नाही? काय आहे नियमावली

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल महागणार, आता किती भरावा लागणार टोल?
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल महागणार, आता किती भरावा लागणार टोल?.
नागपुरातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांचे एकच आवाहन; 'सर्वांनी...'
नागपुरातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांचे एकच आवाहन; 'सर्वांनी...'.
नागपुरात कलम 144 लागू, राड्यानंतर तणावपूर्ण शांतता; नेमकं काय घडलं?
नागपुरात कलम 144 लागू, राड्यानंतर तणावपूर्ण शांतता; नेमकं काय घडलं?.
जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....