महिला खेळाडूंसाठी हेही आव्हान, अशी चाचणी ज्यात स्त्री असल्याचं सिद्ध करावं लागतं, जाणून घ्या काय आहे ‘जेंडर वेरिफिकेशन’?

अलीकडे प्रत्येक खेळात महिला खेळाडू पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून तोडीस तोड खेळाचे प्रदर्शन दाखवत आहे. नुकत्याच झालेल्य़ा ऑलिम्पिक खेळांमध्येही भारतीय महिलांनी दमदार कामगिरी केली.

महिला खेळाडूंसाठी हेही आव्हान, अशी चाचणी ज्यात स्त्री असल्याचं सिद्ध करावं लागतं, जाणून घ्या काय आहे 'जेंडर वेरिफिकेशन'?
धावपटू दुती चंद
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 3:49 PM

मुंबई: जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा…या एका गाण्यातूनच स्त्रियांना एका जन्मात किती आव्हानांना सामोरं जावं लागतं हे कळतं. विविध जबाबदाऱ्या लीलया पेलणाऱ्या स्त्रिया सध्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून तोडीस तोड कामगिरी करत आहेत. क्रिडा क्षेत्रातही स्त्रिया अजिबात मागे नाहीत. याचेच उदाहरण भारताच्या कन्यांनी नुकत्याच ऑलिम्पिक खेळांमध्ये (Tokyo Olympics) केलेल्या कामगिरीवरुन येते. पण असे सर्व असतानाही महिला क्रीडापटूंना आजही बऱ्याच संकटाना तोंड द्यावे लागते.

यातीलच एक म्हणजे ‘जेंडर वेरिफिकेशन’. या विचित्र चाचणीचा बऱ्याच महिला क्रीडापटूंना सामना करावा लागतो. ज्यामध्ये त्यांना स्त्री असल्याचं सिद्ध करावं लागतं. ज्यामुळे अनेक खेळाडूंना मानसिक त्रास होतो. ज्याचा त्यांच्या खेळावरही परिणाम होतो. भारताची महिला धावपटू दुती चंद (Dutee Chand) हिला असा अनुभव काही वर्षांपूर्वी आला होता. यावरच आता रश्मी रॉकेट हा चित्रपट देखील येत असून नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

काय आहे हे जेंडर वेरिफिकेशन?

ही चाचणी महिला खेळाडूं खरंच महिला आहेत का? हे सिद्ध करण्यासाठी केली जाते. पुरुष आणि स्त्री यांच्यात बरेच हार्मोन्स वेगवेगळे असतात. यातीलच एक म्हणजे ‘अँड्रोजन’. या हॉर्मोनमुळे पुरुषांमध्ये काही वेगळ्या गोष्टी असतात. ज्यातूनच त्याच्या चेहऱ्यावर केस(दाढी-मिशी), सपाट छाती, भारदस्त आवाज इत्यादी. पण याच गोष्टी जर स्त्रियांमध्ये आढळून आल्या तर त्यांच्या अँड्रोजन या हार्मोनचं प्रमाण अधिक असल्याचं सिद्ध होतं. ज्यानंतर त्यांना रक्त तपासणी सारख्या प्रक्रियांनाही सामोरं जावं लागतं.

या चाचणीत रक्त तपासणीसोबत त्यांच्या टेस्टोस्टेरॉन मर्यादेचीही तपासणी होते. या अधिकता आढळल्यास DNA टेस्ट केली जाते. त्यानंतर त्यांच्या खाजगी भागांचीही तपासणी केली जाते. यानंतर जर संबंधित महिला खेळाडूमध्ये टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण अधिक असल्यास त्यांना खेळण्यापासून रोखलं जातं. अनेकदा काही महिला खेळाडूंचा शाररिक बांधा पुरुषांप्रमाणे होतो, चेहऱ्यावर केस दिसू लागतात, आवाजातही भारदस्तपणा येतो. ज्यानंतर अशा सगळ्या चाचण्यांना सामोरं जावं लागतं.

काय घडलं होतं दुती चंदसोबत?

तर या जेंडर वेरिफिकेशन चाचणीतून भारताची महिला धावपटू दुती चंद हीला जावं लागलं होतं. 2014 साली दुतीने ताईपेई येथे आयोजित आशियाई  ज्यूनियर एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्णपदकं जिंकली. अवघ्या 18 वर्षाची असताना तिने हा पराक्रम केला. ज्यानंतर ती आगामी कॉमनवेल्थ गेम्सची तयारी करत होती. पण याच दरम्यान तिच्या शरीरात ‘अँड्रोजन’चं प्रमाण अधिक असल्याचं सांगत तिला या कॉमनवेल्थ तसंच आशियाई खेळांमध्ये भाग घेण्यापासून रोखण्यात आलं.

ज्यानंतर दुतीने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्समध्ये एथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ एथलेटिक्स फेडरेशन (IAAF) यांच्या विरोधात याचिका दाखल केली. ज्यानंतर अखेर अधिक अँड्रोजन शरीरात असण्याबाबतची पॉलिसी रद्द करण्यात आली आणि दुती पुन्हा एकदा खेळांमध्ये सहभाग घेऊ लागली.  ज्यानंतर 2018 मध्ये जकार्ता येथे आशियाई खेळांमध्ये दुतीने दोन रौप्य पदकं मिळवली. दरम्यान दुतीच्या या सर्व प्रवासावर रश्मी रॉकेट हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

हे ही वाचा

ICC Women ODI Rankings: मिताली राजची रँकिंग घसरली, गोलंदाज झुलन गोस्वामीला मात्र मोठा फायदा

दीपिका पादुकोण विरुद्ध पीव्ही सिंधू, दोघींमध्ये रंगला बॅडमिंटनचा सामना, पाहा PHOTO

DC vs KKR: दिल्ली विरुद्ध कोलकाता सामन्याला वादाचे गालबोट, सामना सुरु असतानाच मॉर्गनच्या अंगावर आला आश्विन, पाहा VIDEO

(What is gender test which women athletes need to do the film rashmi rocket is on this issue only)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.