भारताच्या 16 वर्षाच्या मुलाने रचला इतिहास, वर्ल्ड नंबर 1 चेस मास्टर कार्लसनला हरवलं
भारताचा युवा ग्रँडमास्टर आर प्रागननंदाने (praggnanandhaa) मोठा उलटफेर केला आहे. त्याने जगातील नंबर 1 चेस मास्टर मॅगनस कार्लसनला (magnus carlsen) rपराभवाचा धक्का दिला.
नवी दिल्ली: भारताचा युवा ग्रँडमास्टर आर प्रागननंदाने (praggnanandhaa) मोठा उलटफेर केला आहे. त्याने जगातील नंबर 1 चेस मास्टर मॅगनस कार्लसनला (magnus carlsen) पराभवाचा धक्का दिला. ही कामगिरी करणारा प्रागननंद अवघ्या 16 वर्षांचा आहे. कार्लसन आणि प्रागननंदच्या वयामध्ये मोठं अंतर आहे. कार्लसन 31 वर्षांचा आहे. भारतीय ग्रँडमास्टरने रविवारी काळ्या मोहऱ्यांनी खेळताना वर्ल्ड नंबर 1 कार्लसनला 39 चालींमध्ये हरवलं. ऑनलाइन रॅपिड चेस स्पर्धा (Chess Tournament) एयरथिंग्स मास्टर्समध्ये प्रागननंदने हे यश मिळवलं आहे. चेन्नईच्या प्रागननंदाने दिग्गजांना हैराण करण्याची ही पहिली वेळ नाहीय. यापूर्वी 2018 मध्ये त्याने इतिहास रचला आहे. त्यावेळी प्रागननंद जगातील दुसरा युवा चेस ग्रँड मास्टर बनले होते.
तेव्हा प्रागननंदचे वय अवघे 12 वर्ष 10 महिने होतं. तो दुसरा युवा चेसपटू बनला आहे. जगातील युवा चेस ग्रँड मास्टरचा किताब यूक्रेनच्या सर्जी कारजाकिनकडे आहे. 12 वर्ष सात महिन्यांचा असताना त्याने हे यश मिळवलं होतं. प्रागननंद एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो. घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे त्याने चेस खेळू नये असं वडिलांच मत होतं.
पण प्रागननंदची बहिण चेस खेळायची. तिला खेळताना पाहून प्रागननंदची चेसमध्ये रुची वाढली. त्यामुळेच तो आज इथवर पोहोचू शकला. प्रागननंदचा जन्म 10 ऑगस्ट 2005 मध्ये चेन्नईत झाला होता. आरबी रमेश त्याचे कोच आहेत. 16 वर्षाच्या प्रागननंदने 40 देशांचा दौरा केला आहे.
who is chess grand master praggnanandhaa beat world no 1 magnus carlsen rameshbabu praggnanandhaa