PAK vs ZIM : T20 मध्ये 20 धावात 10 विकेट, झिम्बाब्वेची वाट लावली, कोण आहे पाकिस्तानी बॉलर सुफियान मुकीम?

PAK vs ZIM : पहिल्या T20 सामन्यात पाकिस्तानी टीमने झिम्बाब्वेवर आरामात विजय मिळवला. दुसऱ्या मॅचमध्ये पाकिस्तानने कमालाची गोलंदाजी केली. दुसऱ्या T20 सामन्यात निराशेपेक्षा पण झिम्बाब्वेच्या टीमवर लाजिरवाणी स्थिती ओढवली. महत्त्वाच म्हणजे चांगल्या सुरुवातीनंतर झिम्बाब्वेची अशी हालत झाली.

PAK vs ZIM : T20 मध्ये 20 धावात 10 विकेट, झिम्बाब्वेची वाट लावली, कोण आहे पाकिस्तानी बॉलर सुफियान मुकीम?
PAK vs ZIMImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Dec 04, 2024 | 10:29 AM

झिम्बाब्वे दौऱ्यावर पाकिस्तानी क्रिकेट टीमने कमालीच प्रदर्शन केलय. वनडे सीरीज जिंकल्यानंतर त्यांनी पहिल्या T20 सामन्यात यजमान झिम्बाब्वेवर आरामात विजय मिळवला. दुसऱ्या T20 सामन्यात झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांसमोर सपशेल शरणागती पत्करली. चांगल्या सुरुवातीनंतर फक्त 20 धावांत संपूर्ण टीम ऑलआऊट झाली. पाकिस्तानचा युवा स्पिनर सुफीयान मुकीमने झिम्बाब्वेच्या टीमला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. संपूर्ण टीम फक्त 57 रन्समध्ये ऑलआऊट झाली. T20 इंटरनॅशनलमध्ये झिम्बाब्वे टीमची आतापर्यंतची ही सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे.

बुलावायोमध्ये मंगळवारी 3 डिसेंबरला सीरीजमधला दुसरा सामना खेळला गेला. यजमान झिम्बाब्वेची टीम प्रथम फलंदाजीसाठी उतरली होती. पहिल्या मॅचमधील पराभवानंतरही सिकंदर रजाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. पाकिस्तानने सुद्धा सामना जिंकून देणाऱ्या खेळाडूंवर विश्वास दाखवला. पाकिस्तानचा विश्वास सार्थ ठरला पण झिम्बाब्वेच्या पदरी निराशा आली. निराशेपेक्षा पण यावेळी लाजिरवाण्या स्थितीचा सामना करावा लागला.

दमदार सुरुवातीनंतर झिम्बाब्वेचा डाव कसा गडगडला?

झिम्बाब्वेने आपल्या डावाची स्फोटक सुरुवात केली होती. त्यांची ओपनिंग जोडी ब्रायन बॅनेट आणि ताडीवानाशे मारुमानीने मैदानात येताच पाकिस्तानी गोलंदाजांवर हल्लाबोल केला. दोघांनी 4 ओव्हरमध्ये 37 धावा कुटल्या. इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण पाचव्या ओव्हरपासून विकेट जाण्याचा जो सिलसिला सुरु झाला, तो टीम ऑलआऊट होईपर्यंत कायम होता. झिम्बाब्वेचा पहिला विकेट 37 रन्सवर गेला. त्यानंतर फक्त 57 रन्सवर संपूर्ण टीम ऑलआऊट झाली. म्हणजे 20 धावांच्या आत झिम्बाब्वेच्या टीमने सर्व 10 विकेट गमावल्या.

कोण आहे सुफियान मुकीम?

पाकिस्तानचा डावखुरा फिरकी गोलंदाज सुफियान मुकीमने झिम्बाब्वेची ही हालत केली. आपला सातवा टी 20 सामना खेळणाऱ्या मुकीमने तीन ओव्हरमध्ये झिम्बाब्वेची निम्मी टीम पॅव्हेलियनमध्ये पाठवली. मुकील गोलंदाजीला येण्याआधी झिम्बाब्वेची धावसंख्या होती 4 बाद 44. त्यानंतर 2.4 ओव्हरमध्ये त्याने 16 चेंडूत झिम्बाब्वेचे 5 विकेट काढले. त्याने त्यासाठी फक्त 3 धावा दिल्या. अशा प्रकारे मुकीमने T20 इंटरनॅशनलमध्ये पाकिस्तानसाठी बेस्ट बॉलिंग फिगरचा रेकॉर्ड बनवला. पाकिस्तानसाठी लक्ष्य फार मोठ नव्हतं. त्यांच्या ओपनर्सनी मैदानावर येताच फटकेबाजी सुरु केली. पावरप्लेमध्येच मॅच संपवली. 5.3 ओव्हर्समध्ये 61 धावांच लक्ष्य गाठलं. मॅचसह सीरीज आरामात जिंकली.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.