पाकिस्तानच्या ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूकडून मॅच फिक्सिंगची ऑफर : उमर अकमल

पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कसोटीपटू मन्सूर अख्तर यांनी मॅच फिक्सिंगसाठी आपल्याशी संपर्क साधला होता, असा आरोप क्रिकेटपटू उमर अकमल याने केला आहे. Global T20 स्पर्धेमध्ये अकमल सध्या खेळत आहे

पाकिस्तानच्या 'या' दिग्गज क्रिकेटपटूकडून मॅच फिक्सिंगची ऑफर : उमर अकमल
Follow us
| Updated on: Aug 08, 2019 | 9:58 AM

इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कसोटीपटू मन्सूर अख्तर (Mansoor Akhtar) यांनी मॅच फिक्सिंग (Match Fixing) करण्याची ऑफर दिली, असा आरोप पाकिस्तानचा वादग्रस्त फलंदाज उमर अकमल (Umar Akmal) याने केला आहे. कॅनडात सुरु असलेल्या ग्लोबल ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेदरम्यान फिक्सिंगसाठी आपल्याला संपर्क साधल्याचा दावा अकमलने केला आहे.

उमर अकमलने पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या (पीसीबी) लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली आहे. अकमल स्पर्धेत ‘विनिपेग हॉक्स’ संघाकडून खेळत आहे. त्याने काही दिवसांपूर्वी पीसीबी आणि ग्लोबल ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या आयोजकांकडे यासंदर्भात तक्रार केल्याची माहिती आहे.

‘विनिपेग हॉक्स’ संघाच्या व्यवस्थापन मंडळाचा सदस्य असलेल्या अख्तर यांनी काही सामन्यांमध्ये ‘निकाल निश्चित’ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याचा प्रस्ताव माझ्यापुढे ठेवला, असा अकमलचा आरोप आहे.

61 वर्षीय अख्तर यांनी 1980 ते 1990 या काळात 19 कसोटी आणि 41 एकदिवसीय सामने खेळले आहेत. अख्तर सध्या यूएसबाहेर असून अकमलच्या तक्रारीनंतर त्यांच्याशी कोणाचाच संपर्क होऊ शकलेला नाही.

मार्च-एप्रिल महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पाकिस्तानच्या एकदिवसीय मालिकेत अकमलला संघात स्थान मिळालं होतं. मात्र नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेतून उमर अकमलला वगळण्यात आलं होतं. विश्वचषक 2015 आणि हाँगकाँग सुपर सिक्समध्ये मॅच फिक्सिंगसाठी आपल्याला संपर्क झाल्याचा आरोपही अकमलने यापूर्वी केला होता.

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.