एकीकडे दोन देशात तणावाची स्थिती, दुसरीकडे शोएब विराटला म्हणतो…
मुंबई : पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात तणावाचं वातावरण आहे. दोन्ही देशातील राजकीय नेते, सेलिब्रेटी आणि क्रिकेटर्स आपापल्या लष्कराच्या पाठीशी उभे राहिले आहेत. असेच ट्वीट पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकनेही केले होते, त्यामुळे भारतात त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आले. मात्र, आता शोएब मलिकने नवीन ट्वीट करत, अप्रत्यक्षरित्या मैत्रीचा हात पुढे केला आहे. पाकिस्तानी […]
मुंबई : पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात तणावाचं वातावरण आहे. दोन्ही देशातील राजकीय नेते, सेलिब्रेटी आणि क्रिकेटर्स आपापल्या लष्कराच्या पाठीशी उभे राहिले आहेत. असेच ट्वीट पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकनेही केले होते, त्यामुळे भारतात त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आले. मात्र, आता शोएब मलिकने नवीन ट्वीट करत, अप्रत्यक्षरित्या मैत्रीचा हात पुढे केला आहे.
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला उद्देशून म्हटलंय की, “आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांच्या सर्वाधिक धावसंख्येच्या यादीत ‘तिसरा’ क्रमांक शेजारी विराट कोहलीसोबत शेअर करायला मिळाल्याने आनंद झाला आहे.”
Delighted to share the #3 spot of T20I runs with my neighbour @imVkohli ?
— Shoaib Malik ?? (@realshoaibmalik) February 28, 2019
आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकच्या नावावर 2,263 धावा आहेत, तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या टी-20 सामन्यात 72 धावांची खेळी केल्याने त्याचीही एकूण धावसंख्या 2,263 झाली आहे. म्हणजेच, शोएब मलिका आणि विराट कोहली या दोघांचीही टी-20 सामन्यांमधील धावसंख्या सारखी असून, या क्रमवारीत दोघेही तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाले आहेत.
हेच निमित्त साधत क्रिकेटर शोएब मलिकने विराट कोहलीला ट्विटरवर टॅग करुन सदिच्छा दिल्या आहेत. मात्र, हे शोएबचं हे ट्वीट म्हणजे त्याच्या आधीच्या ट्वीटची सारवासारव मानली जात आहे. कारण आधी त्याने ‘पाकिस्तान जिंदाबाद’ असे ट्वीट केले होते, त्यावरुन शोएबला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते.
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने 111 टी-20 सामन्यांमधील 104 इनिंगमध्ये 2,263 धावा नावावर केल्या आहेत, तर विराट कोहलीने केवल 67 सामन्यांमधील 62 इनिंगमध्येच 2,263 धावांची नोंद केली आहे.
शोएब मलिक हा भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झाचा पती आहे. त्यामुळे शोएबच्या वक्तव्यांकडे भारतीयांच लक्ष असतं. आता शोएबने विराटला उद्देशून केलेल्या ट्वीटच्या निमित्ताने मैत्रीचा हात पुढे केल्याने, अर्थात त्याच्या ट्वीटची चर्चा होणारच.