Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinesh Phogat Retires : ‘तू हरली नाहीस, तुला…’ विनेशच्या निवृत्तीवर कुस्ती विश्वातून मोठी प्रतिक्रिया

Vinesh Phogat Retires : काल संपूर्ण भारताला धक्का बसला. ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटात कुस्तीची फायनल होण्याआधी विनेश फोगाट अपात्र ठरली. 100 ग्रॅम जास्त वजनामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं. जे काही घडलं, त्यामुळे सगळे भारतीय हळहळले. त्यानंतर विनेशने आणखी एक मनाला चटका लावणारा निर्णय घेतला आहे. तिने निवृत्ती जाहीर केली आहे.

Vinesh Phogat Retires : 'तू हरली नाहीस, तुला...' विनेशच्या निवृत्तीवर कुस्ती विश्वातून मोठी प्रतिक्रिया
Vinesh Phogat disqualified from Paris Olympics final
Follow us
| Updated on: Aug 08, 2024 | 8:54 AM

भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटने कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तिने सोशल मीडिया एक्स वर पोस्ट करुन या निर्णयाची माहिती दिली. विनेश फोगाटच्या या निवृत्तीवर प्रसिद्ध कुस्तीपटू बजरंग पुनियाने प्रतिक्रिया दिली आहे. ‘तू हरलेली नाहीस, तुला हरवण्यात आलय’. विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये पोहोचली होती. पण तिचं वजन 100 ग्रॅम जास्त भरल्याने विनेशला फायनलआधी अपात्र घोषित करण्यात आलं. विनेश फायनलमध्ये पोहोचल्याने भारताच मेडल निश्चित झालं होतं. यावेळी पदकाचा रंग सुद्धा बदलणार होता. सुवर्ण किंवा रौप्य यापैकी एक पदक निश्चित होतं. अजून पदक येण्याची अपेक्षा आहे. कारण प्रकरण कोर्टात आहे. निर्णय विनेशच्या बाजूने लागला, तर भारताला रौप्यपदक मिळेल.

‘मां कुश्ती मेरे से जीत गई मैं हार गई’ असं भावनिक टि्वट विनेशने केलय. “माफ कर, माझी हिम्मत, तुझ स्वप्न मोडलय. यापेक्षा आता माझ्यात जास्त ताकद राहिलेली नाही. अलविदा कुस्ती 2001-2024” असं विनेशने टि्वटमध्ये म्हटलं आहे. ‘मी नेहमीच तुमच्या सर्वांची ऋणी राहीन, माफी’. विनेश फोगाटच्या या पोस्टनंतर बजरंग पुनियाने एक पोस्ट केलीय. त्यात त्याने म्हटलय की, “विनेश तू हरलेली नाहीस, तुला हरवण्यात आलय. आमच्यासाठी नेहमीच तू विजेता राहशील. भारताची बेटी असण्याबरोबरच तू भारताचा अभिमान आहेस”

कोर्टात प्रकरण

विनेश फोगाटला अपात्र ठरवण्याविरोधात क्रीडा लवादाकडे अपील करण्यात आलय. संयुक्त रौप्य पदक देण्याची मागणी करण्यात आली आहे. ऑलिम्पिक स्पर्धा सुरु झाल्यानंतर किंवा उद्घाटन समारंभाच्या आधी कुठलाही वाद निर्माण झाल्यास क्रीडा लवादाकडे न्याय मागता येतो. विनेशच्या प्रकरणाची गुरुवारी सकाळी सुनावणी होईल. सेमीफायनलमध्ये विनेशने ज्या क्युबाच्या बॉक्सरला हरवलं, गुजमेन लोपेज ती फायनल खेळली.

कितीही वेळ वजन करण्याची मुभा

युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या (यूडब्ल्यूडब्ल्यू) नियमानुसार, कुस्तीपटूला वजन करण्याची जी वेळ दिली जाते, त्यात त्याला अनेकदा वजन करता येतं. नियमानुसार, कुठलाही खेळाडू पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा वजन करण्यावेळी उपस्थित नसेल, तर त्याला अयोग्य ठरवलं जातं. त्याला स्पर्धेबाहेर करण्यात येतं.

‘असं वाटतय घरात कोणाचा मृत्यू झालाय’

विनेशने पहिल्या सामन्यात विद्यमान चॅम्पियन युइ ससाकीला हरवलं. फायनलमध्ये अमेरिकेच्या सारा एन हिल्डब्रांट विरुद्ध खेळायचं होतं. भारतीय कुस्ती पथक या घटनेमुळे निराश झालय. विनेशने ऑलिम्पिक आधी म्हटलं होतं की, ‘हे तिचं शेवटच ऑलिम्पिक आहे’ भारताचे राष्ट्रीय महिला कोच वीरेंदर दहिया म्हणाले की, “प्रत्येकाला असं वाटतय की, घरात कोणाचा मृत्यू झालाय. प्रत्येकाला धक्का बसलाय”

नागपुरात संचारबंदी कायम; 170 शाळा बंद, जनजीवन विस्कळीत
नागपुरात संचारबंदी कायम; 170 शाळा बंद, जनजीवन विस्कळीत.
दगंलीचं विस्तव विझेल पण भडकाऊ वक्तव्यांच काय? फडणवीसांची राणेंना तंबी
दगंलीचं विस्तव विझेल पण भडकाऊ वक्तव्यांच काय? फडणवीसांची राणेंना तंबी.
विकासचा मृत्यू मारहाणीमुळेच; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासे
विकासचा मृत्यू मारहाणीमुळेच; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासे.
औरंगजेब कबरीचा वाद सुरू अन् पुरातत्व विभागाकडून धक्कादायक माहिती उघड..
औरंगजेब कबरीचा वाद सुरू अन् पुरातत्व विभागाकडून धक्कादायक माहिती उघड...
लाडके असले तरी काहीही बोलायला मुभा नाही; नितेश राणेंना घरचा आहेर
लाडके असले तरी काहीही बोलायला मुभा नाही; नितेश राणेंना घरचा आहेर.
नागपुरातील हिंसाचाराला जबाबदार कोण? राड्यातील मास्टरमाईंडचे नाव समोर
नागपुरातील हिंसाचाराला जबाबदार कोण? राड्यातील मास्टरमाईंडचे नाव समोर.
कामावरून घरी निघाले, रस्त्यातच अघटित घडलं अन्.. चौघांचा होरपळून मृत्यू
कामावरून घरी निघाले, रस्त्यातच अघटित घडलं अन्.. चौघांचा होरपळून मृत्यू.
'गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत, कारण भाजपच्या 'पोटात' नवा शिवाजी...'
'गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत, कारण भाजपच्या 'पोटात' नवा शिवाजी...'.
छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला
छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला.
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणार नाही?
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणार नाही?.