Paris Olympics 2024 : ऑलिंपिक खेळाडूंशी बोलताना PM मोदींची नीरज चोप्राकडे खास डिमांड
Paris Olympics 2024 : 2024 ऑलिंपिक स्पर्धा यावेळी पॅरिसमध्ये पार पडणार आहे. 26 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक पार पडेल. यंदा ऑलिंपिकसाठी जाणाऱ्या पथकासोबत मोदींनी खास चर्चा केली. मोदींनी यावेळी ऑलिंपिक खेळाडूंना एक प्रश्न विचारला.
ऑलिम्पिक या वर्षातील सर्वात मोठा इवेंट आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान ऑलिम्पिक स्पर्धेच आयोजन करण्यात आलं आहे. ऑलिम्पिंकसाठी 120 खेळाडूंच पथक पाठवण्यात येणार आहे. यावर्षी सर्वाधिक मेडल जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिकला जाणाऱ्या पथकाची भेट घेतली. यावेळी खेळाडूंशी त्यांची काय चर्चा झाली, त्याचा व्हिडिओ समोर आलाय.
पंतप्रधान मोदी यांनी ऑलिम्पिंकला जाणाऱ्या खेळाडूंसोबत बोलताना खेलो इंडियाबद्दल चर्चा केली. या दरम्यान ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राशी सुद्धा मोदींनी चर्चा केली. मोदी यावेळी नीरज चोप्राला गमतीने म्हणाले की, ‘तुझा चूरमा अजून आलेला नाही’ त्यावर उत्तर देताना नीरज म्हणाला की, ‘मी चूरमा घेऊन जरुर येणार’. त्यावर पीएम मोदी म्हणाले की, मला तुझ्या आईच्या हातचा चूरमा खायचा आहे. 2021 साली नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेती कामगिरी केली होती. त्यावेळी पीएम मोदी यांनी सर्व खेळाडूंना नाश्त्याला आमंत्रित केलं होतं. पीएम मोदी यांनी नीरज चोप्रासाठी स्पेशल चूरमा बनवून घेतला होता.
मोदींनी खेळाडूंना काय उदहारण दिलं?
पीएम मोदी यांनी ऑलिम्पिकला जाणाऱ्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवला. क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना भेटून माहिती घेण्याचा माझा प्रयत्न असतो असं त्यांनी सांगितलं. यावेळी सुद्धा तुम्ही भारताच नाव उज्वल कराल, हा आम्हाला विश्वास आहे, असं मोदी म्हणाले. “मी अशा सुद्धा काही खेळाडूंना ओळखतो, जे कधीच परिस्थितीला दोष देत नाहीत. मेहनत करुन नाव कमावतात. ऑलिम्पिक शिकण्याच एक मोठ मैदान आहे. बरेच खेळाडू शिकण्यासाठी खेळतात. अनेक विद्यार्थी परिस्थितीला दोष देतात. त्यांची जीवनात प्रगती होऊ शकत नाही” असं मोदी म्हणाले.
A memorable interaction with our contingent for Paris Olympics. Let us all #Cheer4Bharat.https://t.co/64fPsDNuRB
— Narendra Modi (@narendramodi) July 5, 2024
पंतप्रधान मोदींनी खेळाडूंना काय विचारलं?
पंतप्रधान मोदींनी खेलो इंडियाबद्दल सुद्धा खेळाडूंशी चर्चा केली. तुमच्यापैकी किती जण खेलो इंडियामधून खेळाडू बनले आहेत? असा प्रश्न मोदींनी विचारला. त्यावर अनेक खेळाडूंनी हात उंचावले. शूटर मनू भाकर म्हणाली की, ‘खेलो इंडियाची मला बरीच मदत झाली’. 2018 साली नॅशनल शूटिंगमध्ये तिने गोल्ड मेडल जिंकलं होतं.