Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकच्या ओपनिंग सेरेमनीआधी मोठा राडा, तोडफोड, जाळपोळ

Paris Olympics 2024 : आज पॅरिसमध्ये भव्य ऑलिम्पिक स्पर्धेच्या ओपनिंग सेरेमनीचा सोहळा रंगणार आहे. पुढचे काही दिवस सगळ्या जगाच लक्ष पॅरिसकडे असेल. मात्र, त्याआधी पॅरिसमध्ये मोठा हिंसाचार, तोडफोड झाली आहे.

Paris Olympics 2024 :  पॅरिस ऑलिम्पिकच्या ओपनिंग सेरेमनीआधी मोठा राडा, तोडफोड, जाळपोळ
paris olympics 2024 Image Credit source: Getty Images
Follow us
| Updated on: Jul 26, 2024 | 3:03 PM

पॅरिस ऑलिम्पिक ओपनिंग सेरेमनीच्या काहीतास आधी फ्रान्समध्ये मोठा राडा झाला आहे. जाणीवपूर्वक हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कला लक्ष्य करण्यात आलं. रेल्वे मार्गावर जाळपोळ करण्यात आली. या हिंसाचारामुळे ट्रान्सपोर्ट सिस्टिमवर परिणाम झाला आहे. आज 26 जुलैपासून फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होत आहे. फ्रान्सची ट्रेन ऑपरेटर कंपनी एसएनसीएफने शुक्रवारी न्यूज एजन्सी AFP ला या संपूर्ण घटनेची माहिती दिली. फ्रान्सच्या हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कवर हल्ला करुन जाळपोळ करण्यात आली असं एसएनसीएफकडून सांगण्यात आलं.

यावेळी तोडफोड करण्याचाही प्रयत्न झाला. ट्रेन नेटवर्कला पंगु बनवण्यासाठी करण्यात आलेला हा मोठा हल्ला आहे. यामुळे अनेक ट्रेन्स रद्द कराव्या लागल्या असं तपास करणाऱ्या एका सूत्राने AFP ला सांगितलं. पॅरिसमध्ये भव्य ऑलिम्पिक सेरेमनीची तयारी सुरु असताना हे हल्ले करण्यात आले. ओपनिंग सेरेमनीमध्ये 7,500 एथलीट, 300,000 प्रेक्षक आणि वीआयपी सहभागी होणार आहेत.

ओपनिंग सेरेमनीला बसू शकतो हवामानाचा फटका

या हल्ल्यामुळे 8 लाख ट्रेन प्रवासी प्रभावित झालेत, असं एसएनसीएफ समूहाच्या अध्यक्षांनी बीएफएमटीवीला सांगितलं. france24.com च्या रिपोर्ट्नुसार यूरोस्टार (रेलवे कंपनी) ने सांगितलं की, लंडन आणि पॅरिस दरम्यान तोडफोडीच्या घटनांमुळे रेल्वे सेवा बाधित झाली आहे. अनेक ट्रेन्स रद्द झाल्या. प्रवाशांचा प्रवासाचा वेळ वाढला. सीन नदी किनारी ऑलिम्पिकची ओपनिंग सेरेमनी होणार आहे. यावेळी हवामानाचा फटका बसू शकतो. हवामान विभागाने शुक्रवारी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दुपारी हवामान स्वच्छ राहिलं. संध्याकाळी पाऊस कोसळू शकतो. याचवेळी ओपनिंग सेरेमनी होणार आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.