क्रिकेटच्या मैदानात कुस्तीचा सामना! तो आला आणि थेट घुसला मग काय दे धपाधपा, Watch Video
भारतात क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी आली आहे. आता तर क्रिकेट चाहते थेट मैदानात घुसण्याचं प्रमाणदेखील वाढलं आहे. दिल्लीत सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीतही असाच काहीसा प्रकार घडला.
दिल्ली : भारत हा क्रिकेट रसिकांचा देश आहे. भारताचा सामना म्हंटलं की चाहते मैदानावर पोहोचताच पोहोचताच. मग तो सामना भारतात असो की, इतर देशात, तुम्हाला चाहत्यांचं क्रिकेट वेड पाहायला वेळोवेळी मिळेलच.चाहते मैदानात घुसण्याचे अनेक प्रकार आजपर्यंत घडले आहेत.असाच काहीसा प्रसंग दिल्लीतील दुसऱ्या कसोटी सामन्यात पाहायला मिळाला. एका क्रिकेट चाहत्याने सुरक्षा कडं भिडत थेट मैदानात प्रवेश केला. यामुळे सुरक्षारक्षकांची भंबेरी उडाली. त्या चाहत्याला पकडण्यासाठी सुरक्षारक्षकांना प्रयत्नांची परागकाष्ठा करावी लागली.अखेर समोरून आलेल्या सुरक्षारक्षकाने त्याला पकडलं. मात्र तो काही ऐकत नसल्याने एकाने त्याच्या कानशिलातच लगावली. त्यानंतर इतर सुरक्षारक्षकांनी त्याला पकडलं आणि खेचत खेचत मैदानाबाहेर काढू लागले.
मैदानात घुसलेल्या चाहत्याला मारत असल्याचं पाहून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला राहावलं नाही. त्याने तात्काळ जवळ येत त्याला सोडण्याची विनंती केली. तसेच त्याला मारू नका असंही सांगितलं. त्याच्या या कृतीने मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांची मनं जिंकली. हा कृतीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
मैदान में घुसे फैन की गार्ड ने की पिटाई फिर शमी ने दिखाया बड़ा दिल#INDvAUS #Shami #CricketTwitter #DelhiTest pic.twitter.com/Uia7mxZd8s
— Akhil Gupta (@Guptastats92) February 17, 2023
काही महिन्यापूर्वी न्यूझीलँडविरुद्धच्या सामन्यातही असाच प्रकार घडला. एका क्रिकेट चाहत्याने थेट मैदानात धाव घेत कर्णधार रोहित शर्माला मिठी मारली होती. यामुळे रोहित शर्मा मैदानातच धडपडला होता. तेव्हा चाहत्याला पकडण्यासाठी धावत आलेल्या सुरक्षारक्षकांना थांबवत रोहितने तरुण असल्याचं सांगत सोडायला सांगितलं होतं.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने समाधानकारक धावसंख्या उभारली आहे. उस्मान ख्वाजानं जबरदस्त खेळी करत ऑस्ट्रेलियाची बाजू सावरली. त्याने 125 चेंडूत 81 धावांची खेळी केली.सातव्या गड्यासाठी कमिन्स आणि पीटर हँडस्कॉम्बनं जबरदस्त भागीदारी केली.भारताला टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनातून हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. अन्यथा भारताची अंतिम फेरीची आशा धुळीस मिळेल.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर. अश्विन, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि मॅथ्यू कुहनेमन.