पृथ्वी शॉ पहिले दोन कसोटी सामने मुकणार

मुंबई : मुंबईकर पृथ्वी शॉ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान झेल पकडताना पृथ्वीच्या पायाला दुखापात झाली होती. तो अजूनही फीट नसल्याचं मेडिकल टीमने सांगितलंय. पृथ्वी शॉला मैदानात पाहण्यासाठी आता तिसऱ्या कसोटी सामन्याची वाट पाहावी लागणार आहे. ऑस्ट्रेलिया इलेव्हन विरुद्ध सराव सामन्यात पृथ्वी झेल घेत असताना त्याच्या पायाला दुखापात झाली […]

पृथ्वी शॉ पहिले दोन कसोटी सामने मुकणार
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच टीम इंडियाला धक्का बसला आहे. भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉला गंभीर दुखापत झाली आहे.
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:54 PM

मुंबई : मुंबईकर पृथ्वी शॉ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान झेल पकडताना पृथ्वीच्या पायाला दुखापात झाली होती. तो अजूनही फीट नसल्याचं मेडिकल टीमने सांगितलंय. पृथ्वी शॉला मैदानात पाहण्यासाठी आता तिसऱ्या कसोटी सामन्याची वाट पाहावी लागणार आहे. ऑस्ट्रेलिया इलेव्हन विरुद्ध सराव सामन्यात पृथ्वी झेल घेत असताना त्याच्या पायाला दुखापात झाली होती. त्यानंतर मेडिकल टीमने सांगितलं होतं की, पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वी खेळू शकणार नाही. दुसऱ्या सामन्यासाठी पृथ्वी फीट होईल, अशी आशा भारतीय संघ व्यवस्थापनाला होती. पण पृथ्वीला आणखी एक सामना मुकावा लागणार आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही अधिकृत घोषणा करत, पृथ्वी बॉक्सिंग दिन (19 डिसेंबर) रोजी कसोटी सामन्यात पदार्पण करेल, असं सांगितलं. इंग्लंड दौऱ्यात पृथ्वीची निवड झाली होती, पण अंतिम अकरामध्ये त्याला संधी मिळू शकली नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने दमदार पदार्पण केलं. शतकी खेळी करत त्याने हे पदार्पण साजरं केलं होतं. त्यामुळे पृथ्वीचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. पृथ्वीला झालेल्या दुखापतीमध्ये बऱ्यापैकी सुधारणा होत आहे. आता तो व्यवस्थित चालतही आहे. जर या आठवड्यात पृथ्वी थोडा जरी पळू शकतो तर हे भारतीय संघासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल असेही रवी शास्त्री यांनी cricket.com.au ला सांगितले. पहिल्या कसोटी सामन्यासाठी कर्णधार विराट कोहलीने आपल्या 12 खेळाडूंची यादी आज जाहीर केली आहे. ज्यामध्ये 7 फलंदाज आणि 4 गोलंदाज आहेत. तर ऑस्ट्रेलियानेही आपला संघ जाहीर करत व्हिक्टोरियाचा युवा फलंदाज मार्कस हॅरिसला आपल्या संघात स्थान दिले आहे. भारतीय संघ विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, के. एल. राहूल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, हनुमान विहारी, रिषभ पंत, रवीचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रित बुमराह ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक कसोटी मालिका पहिला सामना – 6 डिसेंबर दुसरा सामना – 14 डिसेंबर तिसरा सामना – 26 डिसेंबर चौथा सामना – 3 जानेवारी वन डे मालिका पहिला सामना – 12 जानेवारी दुसरा सामना – 15 जानेवारी तिसरा सामना – 18 जानेवारी

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.