PKL 2021-22 LIVE Score and Updates, Haryana Steelers vs. Patna Pirates: थरारक सामन्यात पटना पायरेटसचा हरयाणावर निसटता विजय
PKL 2021-22 LIVE Score and Updates : प्रो कबड्डी लीगचा (Pro Kabaddi League) आज दुसरा दिवस आहे. आजची पहिली लढत गुजरात जायंटस विरुद्ध जयपूर पिंक पॅथर्समध्ये (Jaipur Pink Panthers) रंगणार आहे. 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
बेंगळुरु: अखेरच्या सेकंदापर्यंत उत्कंठा ताणून धरायला लावणाऱ्या सामन्यात पटना पायरेटसने हरयाणा स्टीलर्सवर (Haryana Steelers vs. Patna Pirates) तीन गुणांच्या फरकाने निसटता विजय मिळवला. पटनाने हरयाणावर 42-39 अशी मात केली. शेवटच्या क्षणापर्यंत सामना कोण जिंकणार? हे हमखासपणे कोणीही सांगू शकत नव्हतं. प्रत्येक रेडच्यावेळी सामन्याचं पारडं फिरत होतं. पण अखेरच्या क्षणी पाटना पायरेटसने कामगिरी उंचावत विजय मिळवला.
पटनाकडून मोनू गोयतने दमदार खेळ केला. रेडमध्ये 11पॉईंट घेत त्याने एकूण 15 गुणांची कमाई केली. पटनाने रेडमध्ये 28 तर हरयाणाने 23 पॉईंट मिळवले. पटनाच्या तुलनेत हरयाणाने टॅकल म्हणजे पकडीमध्ये चांगली कामगिरी केली. टॅकलमुळेच हरयाणाच्या संघाला पटनाला चांगली लढत देता आली. प्रो कबड्डी लीगचे तीन वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या पटनाला विजयासाठी संघर्ष करावा लागला.
नवीन एक्स्प्रेस सुसाट दबंग दिल्लीने या सामन्यात दमदार खेळ दाखवत पुण्याला 41-30 असे अकरा गुणांनी पराभूत केले. दिल्लीने अत्यंत सहजतेने पुण्यावर विजय मिळवला. दिल्लीकडून नवीन कुमारने शानदार खेळाचं प्रदर्शन केलं. जवळपास प्रत्येक रेड म्हणजे चढाईमध्ये त्याने दबंग दिल्लीसाठी गुण मिळवले. रेडमध्ये नवीन कुमारने 14 पॉईंट मिळवले. विजय मलिकने रेड मध्ये सहा पॉईंट मिळवून त्याला चांगली साथ दिली.
गुजरातने असा मिळवला विजय मोक्याच्याक्षणी कामगिरी उंचावत गुजरात जायंटसने (Gujarat Giants) जयपूर पिंक पँथर्सचा (Jaipur Pink Panthers) सात गुणांनी पराभव केला. गुजरातने 34-27 ने अभिषेकच्या पिंक पँथर्सवर विजय मिळवला. प्रो कबड्डी लीगचा (ProKabaddiLeague) आज दुसरा दिवस आहे. अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंक पँथर्स आणि गुजरात जायंटसमध्ये अटी-तटीचा सामना सुरु होता. प्रत्येक गुणांसाठी लढाई सुरु होती. बचावपटूंच्या दमदार कामगिरीमुळे गुजरातला सामना जिंकता आला.
LIVE NEWS & UPDATES
-
उत्कंठावर्धक सामन्यात पटना पायरेटसचा हरयाणावर निसटता विजय
अटीतटीच्या सामन्यात पटना पायरेटसने हरयाणा स्टीलर्सवर अवघ्या तीन गुणांनी विजय मिळवला.
-
मोनू गोयतची दमदार रेड
पटना पायरेटसच्या मोनू गोयतने निर्णायक क्षणी तीन गुण मिळवून दिले. त्यामुळे आघाडी 37-34 झाली आहे.
-
-
पटना पायरेटसकडे सहा गुणांची आघाडी
पटना पायरेटसच्या मोनू गोयतने रेडमध्ये सुपर 10 पॉईंटसचा टप्पा पार केला आहे. पटना पायरेटसकडे सहा गुणांची आघाडी आहे.
-
अटीतटीचा सामना
हरयाणा स्टीलर्स आणि पटना पायरेटसमध्ये अटीतटीचा सामना सुरु आहे. दोन्ही संघांमध्ये दोन ते तीन गुणांचा फरक आहे. त्यामुळे मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावणारा संघ जिंकू शकतो.
-
पहिल्या हाफमध्ये हरयाणा आघाडीवर
आजच्या दिवसाचा तिसरा सामना हरयाणा स्टीलर्स आणि पटना पायरेटसमध्ये सुरु आहे. पहिल्या हाफमध्ये हरयाणा स्टीलर्सकडे 22-18 अशी चार गुणांची आघाडी आहे. उत्कृष्ट पकडीमुळे हरयाणाला पटनावर ही आघाडी मिळवता आली आहे. रेड म्हणजे चढाईत हरयाणाने 13 तर पटनाने 14 गुण मिळवले आहेत.
-
-
हरयाणा स्टीलर्स विरुद्ध पटना पायरेटस सामना सुरु
हरयाणा स्टीलर्स आणि पटना पायरेटसमध्ये दिवसातील तिसरा सामना सुरु झाला आहे. तीनवेळच्या विजेत्या पटना पायरेटसकडे दोन गुणांची निसटती आघाडी आहे.
-
दिल्लीचा पुण्यावर विजय
नवीन कुमारच्या दमदार कामगिरीच्या बळावर दबंग दिल्लीने पुणेरी पलटनचा 11 गुणांनी पराभव केला. दिल्लीचा हा पहिला विजय आहे. दिल्लीने पुण्यावर 41-30 असा विजय मिळवला.
-
दिल्लीची पुण्यावर पुन्हा आघाडी
पुणेरी पलटन ऑलआऊट. दिल्लीकडे 11 गुणांची निर्णायक आघाडी. दबंग दिल्ली 37-26 ने पुढे.
-
दुसऱ्या हाफमध्ये पुण्याचं कमबॅक
दुसऱ्या हाफमध्ये पुण्याने कमबॅक केलं आहे. पुण्याने पॉईंटसमधील अंतर कमी केलं आहे. दबंग दिल्लीला ऑलआऊट केलं आहे.
-
पहिल्या हाफमध्ये दिल्ली आघाडीवर
पहिल्या हाफचा खेळ संपला असून दिल्लीकडे सात गुणांची आघाडी आहे. दिल्लीचे 22 तर पुण्याचे 15 गुण झाले आहेत. रेड म्हणजे चढाईत दिल्लीने 13 तर पुण्याने चढाईत 11 गुण मिळवले आहेत.
-
दोन वेळा पुण्याला केलं ऑलआऊट
दबंग दिल्लीची दमदार कामगिरी सुरु आहे. दिल्लीने मोठी आघाडी घेतली आहे. दबंग दिल्लीने पुणेला दोन वेळा ऑलआऊट केलय. त्यांच्याकडे 21 तर पुणेरी पलटनकडे 10 गुण आहे.
-
दबंग दिल्ली विरुद्ध पुणेरी पलटन
दबंग दिल्ली आणि पुणेरी पलटनमध्ये आजच्या दिवसातील दुसरा सामना सुरु झाला आहे. दिल्लीकडे 6 गुणांची आघाडी आहे. 11-6 ने दिल्ली पुढे आहे.
-
मोक्याच्याक्षणी गुजरातने सामना फिरवला
मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावत गुजरात जायंटसने जयपूरला ऑलआऊट करत तीन गुणांची आघाडी घेतली व जयपूर पिंक पँथर्सचा सात गुणांनी पराभव केला.
-
दोन्ही संघ 25-25 बरोबरीत
गुजरात आणि जयपूरमध्ये अटी-तटीचा सामना. प्रत्येक गुणासाठी संघर्ष. पाच मिनिटांचा खेळ बाकी.
-
गुजरात जायंटसचा संघ आघाडीवर
दुसऱ्या हाफमध्ये गुजरात जायंटसचा संघ 23-21 ने पुढे आहे. रेडमध्ये गुजरातने 12 आणि टॅकलमध्ये 7 गुण मिळवले आहेत. पिंक पॅथर्सने रेडमध्ये 15 आणि टॅकलमध्ये पाच गुण मिळवले आहेत.
-
गुजरात जायंटसकडे फक्त दोन गुणांची आघाडी
पहिल्या हाफमध्ये गुजरात जायंटस फक्त दोन गुणांनी आघाडीवर आहे. गुजरात जायंटस 19 तर जयपूर पँथर्सकडे 17 गुण आहेत. पाच मिनिटाच आठ गुण घेऊन जयपूरने गुजरातशी बरोबरी साधली.
-
गुजरात जायंटसचा दमदार खेळ
रेड म्हणजे चढाई आणि टॅकल म्हणजे पकडीमध्ये दमदार कामगिरी करत गुजरात जायंटसने आघाडी घेतली आहे. गुजरात जायंटसकडे 15 तर जयपूर पिंक पँथर्सकडे 7 गुण आहेत.
-
आजच्या दिवसाचा पहिला सामना सुरु
आजच्या दिवसाचा पहिला सामना अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंक पँथर्स आणि गुजरात जायंटसमध्ये सुरु झाला आहे. जयपूरला दोन पॉईंट आणि गुजरातला एका पॉईंट मिळाला आहे.
-
तीन सीजनमध्ये गुजरात जायंटसचा दमदार खेळ
प्रो कबड्डीच्या पाचव्या सीजनमध्ये गुजरात जायंटसचा प्रवेश झाला. आतापर्यंतच्या तीन सीजनमध्ये संघाने दमदार खेळ केला आहे. टॅकल म्हणजे पकडीमध्ये ही टीम मास्टर आहे. संघाचे 45 टक्के टॅकल यशस्वी ठरले आहेत.
-
पहिल्या सीझनमध्ये अभिषेकची टीम विजेता बनली होती
आजच्या दिवसाचा पहिला सामना अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंक पँथर्स आणि गुजरात जायंटसमध्ये रंगणार आहे. पहिल्या सीझनमध्ये अभिषेकची टीम विजेता बनली होती. पण त्यानंतरच्या सहा सीझनमध्ये पराभव झाला आहे.
Published On - Dec 23,2021 7:04 PM