IND vs SA : गंभीर कोच बनताच ‘या’ खेळाडूला मिळाली नशिबाची साथ, अखेर टीम इंडियाचे उघडले दरवाजे

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये चार सामन्यांची T20 सीरीज सुरु आहे. सीरीजमधील तिसरा सामना काल खेळला गेला. या मॅचमध्ये एका युवा खेळाडूने डेब्यु केला. मागच्या सीजनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना या प्लेयरने दमदार प्रदर्शन केलं होतं. अलीकडेच तो इमर्जिंग एशिया कपमध्ये भारतीय टीमचा भाग होता.

IND vs SA : गंभीर कोच बनताच 'या' खेळाडूला मिळाली नशिबाची साथ, अखेर टीम इंडियाचे उघडले दरवाजे
Team India Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Nov 14, 2024 | 8:49 AM

टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. तिथे चार सामन्यांची T20 सीरीज सुरु आहे. दोन्ही टीम्समध्ये तिसरा सामना सेंचुरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कवर खेळला गेला. टीम इंडियाने ही मॅच जिंकून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाने एक मोठा बदल केला होता. टीम इंडियाकडून एका 27 वर्षाच्या खेळाडूने डेब्यु केला. अलीकडे या खेळाडूने शानदार प्रदर्शन केलं आहे. IPL 2024 मध्ये सुद्धा या खेळाडूने आपली छाप उमटवली होती. त्यानंतर इमर्जिंग आशिया कपमध्ये शानदार खेळ दाखवून स्क्वॉडमध्ये प्रवेश केला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या T20 सामन्यात युवा ऑलराऊंडर रमणदीप सिंहने डेब्यु केला. 27 वर्षाचा रमणदीप देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाबच प्रतिनिधीत्व करतो. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्स आणि केकेआरकडून खेळलाय. मागच्या सीजनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना त्याने कमालीच प्रदर्शन केलं होतं. त्यावेळी केकेआर टीमचा मेंटॉर गौतम गंभीर होता. आता गौतम गंभीर कोच असताना रमणदीपने टीम इंडियाकडून डेब्यु केलायय

देशांर्तगत, आयपीएलमध्ये त्याचा परफॉर्मन्स कसा आहे?

रमणदीप सिंह आतापर्यंत चार फर्स्ट क्लास, 23 लिस्ट ए आणि 57 टी-20 मॅच खेळला आहे. या दरम्यान फर्स्ट क्लासमध्ये त्याने 167 धावा केल्या आहेत. लिस्ट ए मध्ये 397 धावांसह 6 विकेट घेतल्या आहेत. T20 मध्ये त्याच्या नावावर 544 धावा असून 16 विकेट काढलेत. आयपीएलमध्ये खेळताना आतापर्यंत त्याने 20 सामन्यात 170 धावा केल्या आहेत. सहा विकेट काढल्या आहेत. यात 125 धावा त्याने मागच्या सीजनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना बनवल्या. त्याशिवाय इमर्जिंग आशिया कप टी-20 मध्ये रमणदीपने चार सामन्यात तीन इनिंगमध्ये 191.84 च्या स्ट्राइक रेटने एकूण 94 धावा केल्या आहेत.

SA विरुद्ध डेब्युमध्ये प्रदर्शन कसं?

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डेब्यु करताना रमणदीप सिंहने 6 चेंडूत 15 धावा फटकावल्या. तो रनआऊट झाला. या छोट्या खेळीत त्याने 1 चौकार आणि 1 षटकार लगावला. गोलंदाजीत त्याला संधी मिळाली नाही.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.