AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शर्माने पुनरागमनाची घाई करु नये, रवी शास्त्री यांचा सल्ला

रोहितने पुनरागमन करण्याची घाई करु नये. त्याने घाई गडबडीत मैदानावर पुनरागमनाचा निर्णय घेतला, तर त्याची दुखापत वाढेल, असं टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले.

रोहित शर्माने पुनरागमनाची घाई करु नये, रवी शास्त्री यांचा सल्ला
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 6:52 PM

मुंबई : टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ अर्थात सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा याला आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळण्यात आले आहे. गुडघ्याचे स्नायू दुखावल्याने रोहित शर्मा आयपीएलमधील मागील पाच सामने खेळलेला नाही. अशातच रोहितने पुनरागमन करण्याची घाई करु नये. त्याने घाई गडबडीत मैदानावर पुनरागमनाचा निर्णय घेतला, तर त्याची दुखापत वाढेल, असं टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले. (Ravi Shastri On Rohit Sharma Medical Report)

रोहितच्या प्रकृतीवर बीसीसीआय देखरेख करत आहे. रोहितच्या वैद्यकीय अहवालानुसार, त्याने घाई गडबडीत मैदानावर पुनरागमनाचा निर्णय घेतला, तर त्याची दुखापत वाढेल, असा सल्ला रवी शास्त्री यांनी रोहितला दिला आहे.

रोहितला आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्याने चाहते नाराज आहेत. रोहितला दौऱ्यातून वगळण्याला नेटकऱ्यांनी रवी शास्त्रींना जबाबदार धरल्याचं पाहायला मिळालं. मात्र संघाच्या निवडीत प्रशिक्षकांचे मत विचारात घेतले जात नाही, तो निर्णय सर्वस्वी सिलेक्टर्सचा असतो, अशी स्पष्ट भूमिका रवी शास्त्री यांनी मांडली.

रोहितचा संघात समावेश न करण्याचा निर्णय निवड समितीने त्याचा वैद्यकीय अहवाल पाहून घेतला होता. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक रोहितवर लक्ष ठेवून आहे. संघाच्या निवड प्रक्रियेत मी सामिल नाही. रोहितने निवड समितीला त्याच वैद्यकीय अहवाल सादर केला आहे आणि त्यानंतर निवड समितीने त्यांचा निर्णय घेतला. त्यांचे काम त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे.

रोहित दुखापतीतून सावरतोय- कायरन पोलार्ड

रोहितच्या कमबॅकबाबत पोलार्ड म्हणाला की, रोहित त्याच्या दुखापतीमधून सावरतोय, लवकरच तो संघात कमबॅक करेल. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यानंतर पोलार्ड समलोचकांशी बोलत होता. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यादरम्यान रोहितच्या डाव्या पायाचे स्नायू दुखावले गेले होते. त्यातूनत रोहित आता सावरतोय.

रोहितवरील उपचार आणि त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवून असलेल्या एका सुत्राने गोपनियतेच्या अटीवर सांगितले की, रोहित प्ले ऑफमधील सामने खेळण्याची अधिक शक्यता आहे. संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम राहणार असल्याने रोहितला दुखापतीमधून सावरण्यासाठी आणि फिट होण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे.

(Ravi Shastri On Rohit Sharma Medical Report)

संबंधित बातम्या

IPL 2020 : रोहित शर्माच्या कमबॅकबाबत कायरन पोलार्डचं मोठं वक्तव्य

India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हिटमॅन’ संघाबाहेर

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.