India vs Australia 2020 | अश्विन अजूनही टी 20 मध्ये टीम इंडियासाठी महत्त्वाचा मोहरा, मोहम्मद कैफला विश्वास
अश्विनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतच स्थान देण्यात आलंय.
सिडनी : टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात (Team India Tour Australia) एकदिवसीय मालिकेपासून होत आहे. 27 नोव्हेंबरपासून 3 सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे. या मालिकेनंतर अनुक्रमे टी 20 आणि कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनला (Ravichandran Ashwin) केवळ कसोटी मालिकेतच स्थान देण्यात आलंय. अश्विन हा अजूनही टी 20 साठी उपयुक्त गोलंदाज आहे. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी 20 मालिकेत स्थान द्यायला हवं होतं, अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि आयपीएलमधील दिल्लीचा प्रशिक्षक मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) दिली आहे. कैफने याबाबत एक ट्विट केलंय. ravichandran ashwin can still be a valuable asset for india in T 20 cricket, said indian former player mohammad kaif
ट्विटमध्ये काय म्हटलंय?
”अश्विनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी समाविष्ट करायला हंव होतं. अश्विन आयपीएलच्या 13 व्या मोसमात दिल्लीकडून खेळत होता. अश्विनने विराट कोहली , रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, डेव्हिड वॉर्नर, ख्रिस गेल, करुण नायर, जोस बटलर, स्टीव स्मिथ, देवदत्त पडीक्कल आणि निकोलस पूरन यासर्वांना आयपीएल स्पर्धेत बाद केलं. विशेष म्हणजे या सर्व खेळाडूंना अश्विनने पावर प्लेमध्ये बाद केलं. अश्विन आताही टी 20 मधील उपयुक्त ठरेल”, असा विश्वास कैफने या ट्विटद्वारे व्यक्त केला आहे. अश्विनने आयपीएलच्या 13 व्या मोसमात 15 सामन्यात 13 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.
Virat, Rohit, Pollard, Gayle, Warner, QDK, Karun, Buttler, Smith, Paddikal, Pooran. Read and re-read @ashwinravi99’s list of big scalps from IPL 13, mostly in power plays. Feel Ash can still be a valuable asset for India in T20Is.
— Mohammad Kaif (@MohammadKaif) November 18, 2020
अश्विन याआधी टी 20, एकदिवसीय आणि कसोटी अशा तीनही प्रकारात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करायचा. अश्विनने 111 एकदिवसीय आणि 46 टी 20 सामन्यात अनुक्रमे 150 आणि 52 विकेट्स घेतल्या आहे. आश्विन गेल्या 3 वर्षांपासून एकदिवसीय आणि टी 20 सामन्यांपासून दूर आहे. 2017 मध्ये चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत पराभूत झाल्यापासून आश्विन एकदिवसीय आणि टी 20 संघातून बाहेर आहे.
मालिकानिहाय सामन्यांचे वेळापत्रक
एकदिवसीय (वनडे) मालिका
पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल
टी-20 मालिका
पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी
कसोटी (टेस्ट) मालिका
पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन
संबंधित बातम्या :
INDIA TOUR AUSTRALIA | टीम इंडियाविरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया टीमची घोषणा
India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी टीम इंडियाची घोषणा
ravichandran ashwin can still be a valuable asset for india in T 20 cricket, said indian former player mohammad kaif