क्या बोल रहा है बापू! रविंद्र जडेजानं अखेर नाथन लायनची मागणी केली पूर्ण, 24 तासांसाठी केलं असं काम

रविंद्र जडेजानं ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नाथन लायनची मागणी पूर्ण केली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीत खुद्द रविंद्र जडेजा यानेच ही माहिती दिली आहे. ही मागणी फक्त 24 तासांसाठी पूर्ण केल्याचंही स्पष्ट केलं आहे.

क्या बोल रहा है बापू! रविंद्र जडेजानं अखेर नाथन लायनची मागणी केली पूर्ण, 24 तासांसाठी केलं असं काम
रविंद्र जडेजानं नाथन लायनचं अखेर ऐकलं, 24 तासांसाठी का होईना ती मागणी केली पूर्णImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 3:07 PM

मुंबई : बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत भारतानं 2-0 ने आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे दोन्ही कसोटी सामने भारताने तिसऱ्या दिवशीच जिंकले आहेत. या सामन्यात फिरकीपटूंची जादू दिसून आली आहे. भारतीय फिरकीपटूंसमोर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. भारताकडून रविंद्र जडेजा आणि आर. अश्विनची फिरकी जबरदस्त चालली. दोघांनी ऑस्ट्रेलिया निम्म्याहून अधिक संघ तंबूत पाठवला.आता मैदानाबाहेर ऑस्ट्रेलिया आणि भारतीय खेळाडूंची हमरीतुमरी सुरु असल्याचं दिसून येत आहे. आता रविंद्र जडेजानं ऑस्ट्रेलियन खेळाडू नाथन लायनची फिरकी घेतली. रविंद्र जडेजा सोशल मीडियावर कोणालाही फॉलो करत नाही. त्यामुळे त्याला याबाबत वारंवार विचारलं जातं. या गोष्टीची री पकडून नाथन लायन दिल्ली टेस्टपूर्वी सांगितलं होतं की, रविंद्र जडेजा मला इन्स्टाग्रामवर फॉलो करत नाही. मी तुझ्या फॉलो करण्याची वाट पाहात आहे.तू मला फॉलो करशील का? असा प्रश्न देखील विचारला होता.

नाथन लायनच्या विनंतीचा रविंद्र जडेजाने मान ठेवला आहे. तसेच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून नाथन लायनला 24 तासांसाठी फॉलो केलं आहे. नाथन लायनला फॉलो करत असल्याची माहिती देखील त्याने स्वत:च दिली असून स्क्रिनशॉट इन्स्टाग्राम स्टोरीत शेअर केला आहे.

Ravindra_Jadeja

रविंद्र जडेजाने पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 22 षटकात 8 निर्धाव षटकं टाकत 47 धावा देत 5 गडी बाद केले होते. या डावात नाथन लायन नाबाद 0 या धावसंख्येवर होता. त्याचबरोबर रविंद्र जडेजाने पहिल्या डावात 185 चेंडूत 70 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती.पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात रविंद्र जडेजाने 12 षटकात 34 धावा देत 2 गडी बाद केले होते.

रविंद्र जडेजाने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 21 षटकात 2 निर्धाव षटकं टाकत 68 धावा देत 3 गडी बाद केले होते. तसेच फलंदाजी करतानाा 74 चेंडूत 26 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात तर रविंद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाचा निम्म्याहून अधिक संघ तंबूत धाडला. 12 षटकात 1 निर्धाव षटक टाकत 7 गडी बाद केले.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित

दोन कसोटी सामना विजयामुळे भारताला आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिप गुणतालिकेत जबरदस्त फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात आता फक्त दोन अंकांचा फरक पडला आहे. त्यामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम फेरीचा सामना रंगणार असंच चित्र दिसत आहे. आयससीसी गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर, तर भारतानं आपलं दुसरं स्थान कायम ठेवलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने भारताला ही कसोटी मालिका 3-0 ने जिंकायची आहे. भारतासाठी तिसरा कसोटी सामना महत्त्वाचा आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.