Rishabh Pant Income: 5 वर्षातील ऋषभच्या कमाईचा आकडा पाहून विस्फारतील डोळे! दर महिन्याला इतक्या कोटींची कमाई
वयाच्या 25 व्या वर्षी ऋषभ पंत आहे कोट्यवधींचा मालक; दर महिन्याला होते इतकी कमाई
मुंबई: टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर ऋषभ पंतच्या गाडीचा आज (30 डिसेंबर) सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे. देहरादूनमधील मॅक्स रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात इतका भीषण होता की त्यात ऋषभच्या कारचा अक्षरश: चुराडा झाला. तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी सोशल मीडियावर चाहते प्रार्थना करत आहेत. वयाच्या 25 वर्षीय ऋषभने क्रिकेटच्या विश्वात स्वत:ची जबरदस्त छाप सोडली. तो त्याच्या आक्रमक बॅटिंगसाठी ओळखला जातो. टीम इंडियामध्ये सहभागी झाल्यानंतर ऋषभच्या संपत्तीत चांगलीच वाढ झाली. आज तो कोट्यवधींचा मालक आहे.
ऋषभ पंतची संपत्ती किती?
ऋषभने 2020 मध्ये 29.19 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर 2021 मध्ये त्याच्या संपत्तीचा आकडा 5 दशलक्ष डॉलर्स इतका होता. सध्या तो जवळपास 8.5 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 70 कोटी रुपये) संपत्तीचा मालक आहे. ऋषभला आलिशान गाड्यांची खूप आवड आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज, ऑडी 8 आणि फोर्ड यांचा समावेश आहे. या गाड्यांची किंमत कोट्यवधींची आहे.
View this post on Instagram
जाहिरातींमधून जबरदस्त कमाई
ब्रँड एंडोर्समेंटमधूनही ऋषभची चांगली कमाई होते. Dream 11, RealMe, Boat, SG, Noise आणि Cadbury यांसारख्या ब्रँड्सच्या जाहिराती तो करतो. यातून वर्षभरात त्याची दोन दशलक्ष डॉलर्सहून अधिक कमाई होते. ऋषभ हा मूळचा उत्तराखंडचा आहे. मात्र आता तो दिल्लीत राहतो.
अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी
ऋषभ पंतने हा टीम इंडियाच्या कॅप्टन्सीची जबाबदारीसुद्धा सांभाळली होती. आयपीएलमध्ये तो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे. ऋषभ पहिल्यांदा अंडर-19 वर्ल्ड कप 2016 मध्ये भारताकडून खेळताना दिसला. तेव्हा 18 चेंडूत त्याने अर्धशतक झळकावलं होतं. इंटरनॅशनल डेब्यु
1 फेब्रुवारी 2017 रोजी इंग्लंडविरोधात बेंगळुरू टी-20 सामन्यातून त्याने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तर ऋषभने पहिली टेस्ट मॅच ऑगस्ट 2018 मध्ये इंग्लंडविरोधात नॉटिंघममध्ये खेळली होती. वनडे इंटरनॅशनलमध्ये ऋषभने 21 ऑक्टोबर 2018 रोजी पदार्पण केलं.