Rishbh Pant च्या अपघातानंतर धवनसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल, लोकं म्हणाले सल्ला ऐकला असता तर…

ऋषभ पंतच्या गाडीला झालेल्या अपघातानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये धवन त्याला एक सल्ला देताना दिसत आहे.

Rishbh Pant च्या अपघातानंतर धवनसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल, लोकं म्हणाले सल्ला ऐकला असता तर...
Follow us
| Updated on: Dec 30, 2022 | 7:55 PM

Rishbh Pant Accident : क्रिकेटर ऋषभ पंतच्या अपघाताची बातमी सकाळी आली आणि क्रिकेट चाहत्यांची धडधड वाढली. भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंतच्या कारला पहाटे अपघात झाला. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. पंतच्या अपघाताच्या बातमीनंतर त्याचा आणि शिखर धवन यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ( Shikhar Dhawan advice to Rishbh pant to drive slow)

या व्हिडिओमध्ये ऋषभ पंतला शिखर धवनने आरामात गाडी चालवण्याचा सल्ला देतांना दिसला होता. लोकं यावर आज प्रतिक्रिया देतांना म्हणत आहे की, जर त्याने ही गोष्ट ऐकली असतं तर तो आज रुग्णालयात नसता. हरिद्वार जिल्ह्यातील मंगलोर येथे पहाटे 5.30 वाजता पंतची कार दुभाजकाला धडकली. भीषण अपघातात ऋषभ पंत थोडक्यात बचावला.

इंडियन प्रीमियर लीगदरम्यानचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ऋषभ पंत आणि शिखर धवन हे दोघे IPL मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघासाठी खेळतात. ऋषभ पंत आपली सहकारी शिखर धवनला विचारतो की, तु मला कोणता सल्ला देऊ इच्छतो. त्यावर धवन त्याला म्हणतो की, तू गाडी आरामात चालवत जा. त्यानंतर दोघेही हसतात. पंत म्हणतो की, मी तुमचा सल्ला ऐकेल आणि आरामात गाडी चालवेन.’

प्राथमिक उपचारानंतर ऋषभ पंतला आता देहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतच्या डोक्याला आणि गुडघ्याला दुखापत झाली आहे. पहिल्या एक्स-रेनुसार हाडं मोडलेली नाहीत. तो कुठेही भाजला गेलेला नाही. त्याच्या कपाळावर, डाव्या डोळ्याच्या वर, गुडघा आणि पाठीवर जखमा आहेत.

ऋषभ पंतच्या करिअरबाबत बोलायचं झालं तर, त्याने आतापर्यंत 33 कसोटी सामन्यांमध्ये 5 शतके आणि 11 अर्धशतकांच्या मदतीने 2,271 धावा केल्या आहेत. 30 एकदिवसीय आणि 66 टी-20 मध्ये त्याने देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.

बुल्डोडर राज नही चलेगा...धारावीत 'मशिदी'वरुन तणाव, BMC ची गाडी फोडली
बुल्डोडर राज नही चलेगा...धारावीत 'मशिदी'वरुन तणाव, BMC ची गाडी फोडली.
राज ठाकरे यांनी केले अत्यंत मोठे विधान, शिवरायांच्या पुतळ्यावर..
राज ठाकरे यांनी केले अत्यंत मोठे विधान, शिवरायांच्या पुतळ्यावर...
नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?
नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?.
म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?
म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?.
भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू
भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू.
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी.
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस.
धारावी प्रकरणात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा मोठा दावा काय?
धारावी प्रकरणात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा मोठा दावा काय?.
धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात...
धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात....
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप.