Rohit Sharma : सिडनी टेस्ट दरम्यान रोहित शर्माची रिटायरमेंट संदर्भात मोठी घोषणा
Rohit Sharma on Retirement : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीवर आपलं मौन सोडलं आहे. सिडनी टेस्ट मॅचनंतर रोहित शर्मा निवृत्त होणार अशा चर्चा रंगल्या आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्मा पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर रोहित शर्माने मौन सोडलं आहे.
भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन रोहित शर्माने टेस्ट टीममधून निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली आहे. येणाऱ्या दिवसात त्याचा काय प्लान असेल, या बद्दलही रोहित शर्मा बोलला आहे. ऑस्ट्रेलियात टीम इंडियाच्या फ्लॉप प्रदर्शनामुळे सध्या टीम इंडियात अंतर्गत कलह सुरु आहेत. हेड कोच गौतम गंभीर यांना हटवणार, रोहित शर्माची कॅप्टन म्हणून ही शेवटची सीरीज आहे, अशा बातम्या सुरु आहेत. या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आज कॅप्टन रोहित शर्माने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना त्याच्या भविष्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. “सिडनी कसोटीत आपल्याला कोणी टीममधून वगळलं नाही, मीच आऊट ऑफ फॉर्म असल्यामुळे स्वत:हून बाहेर बसण्याचा निर्णय घेतला” असं रोहित शर्मा म्हणाला.
‘मी क्रिकेट सोडून कुठे जात नाहीय’, हे रोहित शर्माने स्पष्ट केलं. रोहित म्हणाला की, “मी कठोर मेहनत करत होतो. पण चांगलं प्रदर्शन होत नव्हतं. म्हणून सिडनी टेस्ट मॅचपासून लांब रहाणं आवश्यक होतं” ‘मी क्रिकेट सोडून कुठे जात नाहीय’, हे रोहित शर्माने आज स्पष्ट केलं. “मी लवकर रिटायर होणार नाही. माझ्या धावा होत नव्हत्या म्हणून मी सिडनी कसोटी न खेळण्याचा निर्णय घेतला. मी कठोर मेहनत करुन कमबॅक करीन. आजा धावा होत नाहीयत, पण म्हणून पाच महिन्यानंतर सुद्धा धावा होणार नाहीत, असं नाहीय” हे रोहित शर्माने स्पष्ट केलं.
‘मी काय करतोय हे मला माहितीय’
“मी सिडनी कसोटीतून बाहेर राहण्याचा निर्णय घेतलाय. पण मी कुठे जात नाहीय. हा रिटायरमेंट किंवा टेस्ट फॉर्मेटपासून दूर जाण्याचा निर्णय नाहीय. माइक, पेन किंवा लॅपटॉपवाला कोणीही माणूस काहीही लिहितो, बोलतो त्याने फरक पडत नाही. ते आमच्याबद्दल निर्णय घेऊ शकत नाहीत. मी सिडनीला आल्यानंतर बाहेर राहण्याचा निर्णय घेतला. हा, धावा होत नाहीयत. पण या गोष्टीची गॅरेंटी नाही की, दोन महिने किंवा सहा महिन्यानंतर तुमच्या धावा होणार नाहीत. मी परिपक्व आहे, मी काय करतोय हे मला माहितीय” असं रोहित शर्मा म्हणाला.