ब्रिजटाऊनच्या केंसिंग्टन ओवल मैदानात टीम इंडियाने नवीन इतिहास रचला. रोहित शर्माने आपल्या नेतृत्वात पहिल्यांदा टीम इंडियाला आयसीसी टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफी मिळवून दिली. टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर भारताचं नाव कोरल्यानंतर रोहित शर्मा याने पहिली पोस्ट केली आहे. रोहित शर्मा याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रोहित शर्मा याने स्वतःचा एक खास फोटो पोस्ट करत मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
विजय मिळवल्यानंतर ब्रिजटाऊनच्या केंसिंग्टन ओवल मैदानावर झोपल्याचा फोटो राहित याने पोस्ट केला आहे. एक्सवर फोटो पोस्ट करत रोहित म्हणाला, ‘फोटो या गोष्टीचं प्रतीक आहे की यावेळी माझ्या भावना काय आहेत… कालचा दिवस माझ्यासाठी काय होता हे व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे अनेक शब्द आहेत. पण कोणत्या योग्य शब्दाचा उपयोग करू कळत नाही… पण मी असं करेल आणि माझ्या भावना व्यक्त करेल…’
This picture epitomises how I’m feeling right now. So many words but can’t find the right ones to express what yesterday meant to me but I will, and I will share them, but right now I’m basking in a dream come true for a billion of us. ❤️🏆 pic.twitter.com/X2eyU3Eaqm
— Rohit Sharma (@ImRo45) June 30, 2024
‘सध्या मी एक स्वप्न सत्यात उतरल्याचा आनंद घेत आहे जे स्वप्न अरबो लोकांनी पाहिलं…’ असं रोहित शर्मा म्हणाला. रोहित याच्या पोस्टवर अनेक चाहते देखील लाईक्स आणि कमेंट करत आनंद व्यक्त करत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त भारतीय क्रिकेट संघाने मिळवलेल्या विजयाची चर्चा रंगली आहे. भारतात देखील उत्साहाचं वातावरण आहे.
आयसीसीने (ICC) रोहित शर्मा याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये विजय मिळवल्यानंतर रोहित ब्रिजटाऊनच्या केंसिंग्टन ओवल मैदानावरील माती चाखताना दिसत आहे. रोहितची ही कृती काहीशी तशी, भावूक करणारी होती. सांगायचं झालं तर, अंतिम सामन्यानंतर रोहित शर्मानेही T20 मधून निवृत्तीची घोषणा केली .
“मी विचार केला नव्हता की टी20i मधून निवृत्त व्हावं. पण, परिस्थिती अशी आली की मी विचार केला की ही निवृत्त होण्यासाठी योग्य वेळ आहे. तसेच टी 20 वर्ल्ड कपसह अलविदा करण्यासाठी यासारखी कोणती उत्तम वेळ नाही” सध्या सोशल मीडियावर भारतीय संघाच्या विजयाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.