MI vs DC : हार्दिकने जो विचारही केला नसेल ते रोहितने डगआऊटमध्ये बसून केलं, त्या निर्णयानंतर मुंबईच्या बाजूने फिरला सामना
MI vs DC : रोहित शर्मा मैदानावर नव्हता, तो डग आऊटमध्ये बसला होता. त्यावेळी तिथूनच रोहित शर्माने असा एक सल्ला दिला, त्यानंतर खेळच बदलला. दिल्लीच्या बाजूने जाणारा सामना मुंबईच्या बाजूने झुकला. विद्यमान कर्णधार हार्दिक पांड्याने असा विचारही केला नसेल.

इथे रोहित शर्माने एक निर्णय घेतला, तिथे दिल्ली कॅपिटल्सची पराभवाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली. डग आऊटमध्ये बसलेल्या हिटमॅनने ते करुन दाखवलं, ज्या बद्दल विद्यमान कर्णधार हार्दिक पांड्याने विचार सुद्धा केला नसेल. अखेरीस निकाल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्सने 12 धावांनी विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्स यंदाच्या सीजनमधली आतापर्यंतची सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबई विरुद्ध खेळण्याआधी त्यांनी एकही सामना गमावला नव्हता. IPL 2025 मध्ये रोहित शर्मा अजून बॅटने आपली कमाल दाखवू शकलेला नाही. पण कॅप्टन म्हणून त्याचं डोकं मात्र चाचा चौधरी सारखं चालतं. डग आऊटमध्ये बसलेल्या रोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मॅच पलटणारा हा निर्णय इनिंगच्या 13 व्या ओव्हरनंतर घेतला.
प्रश्न आहे की, तो निर्णय काय होता?. हा निर्णय म्हणजे रोहित शर्माने मुंबई इंडियन्सचे हेड कोच माहेला जयवर्धने यांना दिलेला एक सल्ला होता. रोहितने 13 व्या ओव्हरनंतर हेड कोच माहेला जयवर्धने यांना चेंडू बदलण्याचा सल्ला दिला. नवीन चेंडू घेऊन विकेटच्या दोन्ही बाजूकडून स्पिन अटॅक सुरु करण्यास त्याने सांगितलं. दिल्लीची टीम त्यावेळी लक्ष्यापासून दूर होती. रोहितच्या त्या निर्णयानंतर दिल्लीची हालत अजून खराब झाली.
रिझल्ट पुढच्या 3 ओव्हरमध्येच दिसला
रोहितचा सल्ला ऐकून मुंबई इंडियन्सने एकाबाजूने कर्ण शर्मा आणि दुसऱ्या बाजूने मिचेल सँटनरला अटॅकला आणलं. त्याचा रिझल्ट पुढच्या 3 ओव्हरमध्येच दिसून आला. दोन्ही गोलंदाजांनी यावेळी फक्त 19 धावा दिल्या. कर्ण शर्माने दिल्लीच्या दोन मोठ्या फलंदाजांना तंबूत पाठवलं. यात स्फोटक ट्रिस्टन स्टबस् आणि केएल राहुल आहेत.
प्लेयर ऑफ द मॅच कोण?
या मॅचबद्दल बोलायच झाल्यास मुंबई इंडियन्सने पहिली बॅटिंग करताना 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून 205 धावा केल्या. 206 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेली दिल्लीची टीम 19 ओव्हर्समध्ये 193 धावांवर ऑलआऊट झाली. मॅचमध्ये 3 विकेट काढणारा कर्ण शर्मा प्लेयर ऑफ द मॅच ठरला. दिल्ली कॅपिटल्सचा पाच सामन्यातील हा पहिला पराभव आहे. मुंबई इंडियन्सचा 6 सामन्यातील हा दुसरा विजय आहे.