AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Tendulkar : अंजलीच्या हट्टामुळे सचिन एवढा चिडला की थेट धमकीच दिली

प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस आहे. क्रिकेटमधून निवृत झाल्यानंतरही सचिनचे करोडो चाहते आहेत. एक समजूतदार आणि सज्जन क्रिकेटर ही त्याची ओळख आहे. पण 90 च्या दशकात वेस्ट इंडिज दौऱ्यावर असे काही घडले की सचिन खूप चिडला आणि त्याने पत्नीला वेगळीच धमकी दिली. नक्की काय झालं होतं ? वाचा तर खरं...

Sachin Tendulkar : अंजलीच्या हट्टामुळे सचिन एवढा चिडला की थेट धमकीच दिली
Follow us
| Updated on: Apr 24, 2024 | 3:35 PM

प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस आहे. क्रिकेटमधून निवृत झाल्यानंतरही सचिनचे करोडो चाहते आहेत. एक समजूतदार आणि सज्जन क्रिकेटर ही त्याची ओळख आहे. पण 90 च्या दशकात वेस्ट इंडिज दौऱ्यावर असे काही घडले की सचिन खूप चिडला आणि त्याने पत्नीला एक अनोखी धमकी दिली. नक्की काय झालं होतं ? वाचा तर खरं…

सचिन तेंडुलकरची ओळख केवळ त्याचे क्रिकेटमधले रेकॉर्ड्स नाहीत. सचिन तेंडुलकर हे क्रिकेटमधलं इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे की, त्याने दोन-चार विक्रम केले नसते तरी त्याची महानता कमी झाली नसती. त्याच्या रेकॉर्ड्स व्यतिरिक्त, त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल इतर अनेक मनोरंजक गोष्टी आहेत. त्या गोष्टींना अंधश्रद्धाही मानता येईल, पण सचिनने आपल्या कारकिर्दीत त्या गोष्टींची खूप काळजी घेतली. यातील काही गोष्टी तुमच्याही लक्षात आल्या असतील. किंवा त्याबद्दल तुम्ही वाचलं असेल. उदाहरणार्थ, फलंदाजीला जाताना सचिन आधी डाव्या पायाचा पॅड बांधायचा. त्यांच्या क्रिकेट किटमध्ये साई बाबांचा फोटो होता. टीमसाठी असलेल्या बसमध्ये किंवा कोणत्याही कारमध्ये ड्रायव्हरनंतर सचिन पहिल्याच सीटवर बसायचा.

या सर्व गोष्टींशिवाय सचिनबद्दल बऱ्याच लोकांना माहीत नसलेली गोष्ट म्हणजे सचिन वॉटर स्पोर्ट्स फारसे आवडायचे नाहीत. किंवा त्याला त्याची भीती वाटायची असेही म्हणू शकतो. सचिनचा एक किस्सा त्याच्या सहकाऱ्यांना अजूनही आठवत असेल. ही घटना 90च्या दशकातील आहे. 1997 मध्ये भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेला होता. तेव्हा सचिन हा भारतीय संघाचा कर्णधार होता, त्याने नुकतेच ते पद स्वीकारले होते. असायचा. एक फलंदाज म्हणून त्याने जागतिक क्रिकेटमध्ये आपली ओळख निर्माण केली होती, पण कर्णधार म्हणून त्याची नुकतीच सुरूवात झाली होती. त्यावेळी भारतीय संघात नवज्योत सिंग सिद्धू, व्हीव्हीएस लक्ष्मण, सौरव गांगुली, राहुल द्रविड, व्यंकटेश प्रसाद, अजय जडेजा असे खेळाडू होते.

वेस्ट इंडिजमध्ये सचिन एवढा का चिडला ?

वेस्ट इंडिजमधील समुद्र, तिथले बीच हे जगभरात प्रसिद्ध आत. आजही भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जातो तेव्हा खेळाडू समुद्रकिनाऱ्यावर मजा करायला जातात. वेस्ट इंडिजमध्ये अनेक समुद्रकिनारे आहेत ज्यांची गणना जगातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांमध्ये केली जाते. 1997 सालच्या त्या दौऱ्यात एक दिवश भारतीय संघाने समुद्रकिनाऱ्यावर गेला होता. फक्त क्रिकेट क्रिकेट न करता जरा बाहेर पडून मौजमजा करणे हा यामागचा उद्देश होता. त्यावेळी बीचवर वॉटर स्कीइंग, जेट स्कीईंग आणि विविध वॉटर स्पोर्ट्स सुरू होते. संघातील बहुतांश खेळाडू त्यांच्या आवडत्या वॉटर स्पोर्ट्सची मजा घेत होते. सगळे मस्ती करत होते. फक्त एक खेळाडू असा होता जो बीचवर एका कोपऱ्यात बसून सगळी मजा बघत होता. तो खेळाडू दुसरा कोणी नव्हे तर सचिन तेंडुलकर होता.

त्या दौऱ्यावर सचिन सोबत त्याची पत्नी अंजली तेंडुलकरही गेली होती. सचिनच-अंजलीच्या लग्नाला दोनच वर्ष झाली होती. बीचवर बसून अंजली सचिनशी गप्पा मारत होती तर इतर खेळाडू मजा-मस्ती करण्यात दंग होते. भारतीय क्रिकेट संघाचे स्टार्स बीचवर आल्याचे पाहून लोकांनाही आनंद झाला. काहींनी खेळाडूंसोबत फोटो क्लिक केले तर काहींनी त्यांचे ऑटोग्राफ घेतले. बऱ्याच वेळाने भारतीय संघातील खेळाडू बीचवर परत आले आणि त्यांनी सचिनला आपल्यासोबत येण्यास सांगितले. मात्र सचिनने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला. काही वेळाने सचिन स्वतःहून येईल, असे संघातील खेळाडूंना वाटले, मात्र बराच वेळ होऊनही सचिन जागेवरून न हलल्याने अंजलीनेही त्याला वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेण्यास सांगितले. मात्र सचिनने तिच्या बोलण्याकडेही दुर्लक्ष केले. तो हळूहळू ‘इरीटेट’ होऊ लागला.

सचिनने अंजलीला दिली धमकी

बाकीचे खेळाडू मजा करत होते, ते पाहून अंजलीने सचिनला पुन्हा वॉटर स्पोर्ट्स साठी जाण्याचा आग्रह केला. सचिनने त्याच्या सहकाऱ्यांना तर नकार दिला पण अंजली त्याला आग्रह करतच होती. वॉटर स्पोर्ट्स खूप मजेदार असतात. त्यामध्ये घाबरण्यासारखे काही नाही, असं म्हणत अजंलीने त्याची समजूत घालायला सुरूवात केली. सचिनने तिचं ऐकून घेतलं पण शेवटी तो चिडलाच. त्याला राग येतो, अशा घटना फार कमी वेळा घडतात, पण त्या दिवशी तो खूप चिडला. तो अंजलीकडे वळला आणि चिडून म्हणाला – “आता तू मला अजून एकदाही वॉटर स्पोर्टसाठी जाण्याचा आग्रह केलास तर मी तुला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ॲलन डोनाल्डसमोर पॅड न घालता फलंदाजीला पाठवीन.”

तो नक्की काय बोलला हे समजायला अंजलीला काही क्षण लागले. मात्र त्याच्या बोलण्याचा अर्थ समजल्यानंतर ती आणि बीचवरील इतर सहकारी खेळाडू जोरजोरात हसू लागले. खरंतर ॲलन डोनाल्ड हा त्या काळातील सर्वात धोकादायक वेगवान गोलंदाज होता. त्या काळात त्याच्या गोलंदाजीचा वेग 145 किलोमीटरपेक्षा जास्त असायचा. वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून परतला होता. त्या दौऱ्यात सचिन तेंडुलकरनेही शानदार शतक झळकावले, पण ॲलन डोनाल्डच्या शानदार गोलंदाजीने तोही प्रभावित झाला. ॲलन डोनाल्डने त्या सीरिजमध्ये सचिनला एकदा बोल्डही केलं होतं. त्यामुळेच सचिनने त्याच्या पत्नीला अशी अनोखी धमकी दिली जी त्याला आजही लक्षात राहिली असेल.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी.
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी.
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.