दर आठवड्याला 3 कोटी कमावणारा खेळाडू तुटलेला फोन वापरतो, जाणून घ्या कारण….

सर्वाधिक पैसा कमावणाऱ्या खेळाडूंमध्ये फुटबॉलपटूंचा (Football) समावेश होतो. जगातील प्रतिष्ठीत लीग मध्ये क्लब फुटबॉल खेळणारे हे खेळाडू खोऱ्याने पैसा कमावतात.

दर आठवड्याला 3 कोटी कमावणारा खेळाडू तुटलेला फोन वापरतो, जाणून घ्या कारण....
Sadio maneImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 4:48 PM

मुंबई: सर्वाधिक पैसा कमावणाऱ्या खेळाडूंमध्ये फुटबॉलपटूंचा (Football) समावेश होतो. जगातील प्रतिष्ठीत लीग मध्ये क्लब फुटबॉल खेळणारे हे खेळाडू खोऱ्याने पैसा कमावतात. त्यांच्याकडे अमर्याद पैसा असतो. त्यांची शानदार लाइफस्टाइल याचा पुरावा आहे. या फुटबॉल लीग मध्ये खेळणारा एक श्रीमंत खेळाडू, तुटलेला फोन वापरायचा, यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण, हे खरं आहे. लिव्हरपूलच्या (Liverpool) सादियो मानेचा (sadio mane) लोकप्रिय स्टार फुटबॉलपटूंमध्ये समावेश होतो. त्याच्या कमाई बद्दल बोलायच झाल्यास, तर तो फक्त क्लबच्या वेतनामधूनच दर आठवड्याला 3 कोटी 35 लाख रुपये कमावतो. सादियोची लाइफ स्टाइल इतरांपेक्षा वेगळी आहे. त्याला कोट्यवधींची गाडी, घर आणि आलिशान वस्तु खरेदी मध्ये रस नाहीय.

अब्जाधीश खेळाडू अजून तुटलेला फोन का वापरतो?

सादियो माने मागच्या दोन-तीन वर्षांपासून तुटलेला फोन वापरतोय. त्याला याबद्दल प्रश्नही विचारण्यात आला. एवढा अब्जाधीश खेळाडू अजून तुटलेला फोन का वापरतो? त्यावर सादियोच उत्तर ऐकण्याची प्रत्येकाला उत्सुक्ता होती. जेव्हा त्याला यावर प्रश्न विचारला, त्यावर तो म्हणाला की, “मी असे हजार फोन खरेदी करु शकतो. मला 10 फरारी, 2 जेट प्लेन आणि 20 डायमंड घड्याळांची काय गरज आहे? मी गरीबी बघितलीय. शिक्षणासाठी शाळेत जाता आलं नाही. म्हणूनच मी माझ्या देशात शाळा बनवल्या. जेणेकरुन मुलांना शिकता येईल. फुटबॉल स्टेडियम बांधले”

त्याचा वाईट काळ आठवला

सादियोला बोलताना त्याचा वाईट काळ आठवला. “एकवेळ अशी होती, जेव्हा माझ्याकडे खेळण्यासाठी बूट नव्हते. चांगले कपडे नव्हते. आज माझ्याकडे सगळं आहे. त्याचं मी प्रदर्शन करु का? माझ्याकडे जे आहे, ते मला तुमच्यासोबत वाटायचं आहे” असं सादियो म्हणाला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.