Sania Mirza: दुबईमध्ये सानियाच बर्थ डे सेलिब्रेशन, वाढदिवसाला कोणा-कोणाची हजेरी?
Sania Mirza: शोएबने टि्वट करुन शुभेच्छा दिल्या, त्यावर सानियाने....
दुबई: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने आज वयाच्या 36 व्या वर्षात पदार्पण केलं. सानिया मिर्झाने दुबईमध्ये हा खास दिवस आपल्या जवळच्या माणसांसोबत साजरा केला. प्रसिद्ध चित्रपट निर्माती फराह खान, गायिका अनन्या बिर्ला सानियाच्या बर्थ डे सेलिब्रेशनच्या कार्यक्रमाला हजर होते. सानियाच्या बर्थ डे पार्टीमध्ये नवरा शोएब मलिकची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.
टि्वटकडे दुर्लक्ष
शोएब मलिक आणि सानिया मिर्झा विभक्त होणार असल्याच्या चर्चा आहेत. दोघांचा घटस्फोट झाल्याच्या बातम्या पाकिस्तानी आणि दुबईच्या मीडियामधून येत आहेत. सानिया मिर्झाने शोएब मलिकच्या त्या टि्वटकडे दुर्लक्ष केलय.
फराहसोबत जुनी मैत्री
सानिया मिर्झा आणि फराह खान यांच्यात जुनी मैत्री आहे. फराहने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सानियाच्या बर्थ डे चा व्हिडिओ पोस्ट केलाय. शोएब मलिकने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असल्या, तरी सानियाने त्याला कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही.
Happy Birthday to you @MirzaSania Wishing you a very healthy & happy life! Enjoy the day to the fullest… pic.twitter.com/ZdCGnDGLOT
— Shoaib Malik ?? (@realshoaibmalik) November 14, 2022
शोएबने टि्ववटमध्ये काय म्हटलय?
शोएब मलिकने टि्वट केलय. त्यात त्याने ‘हॅप्पी बर्थ डे सानिया मिर्झा. तुला स्वस्थ आणि सुखी आयुष्य लाभो. आजचा दिवस आनंदाने साजरा कर’ असं त्या टि्वटमध्ये म्हटलं आहे. शोएब मलिकने या टि्वटसह एक फोटो पोस्ट केलाय. त्यात त्याने काळ्या रंगाचा शेरवानी घातला आहे. सानिया मिर्झा सुद्धा ब्लॅक ड्रेसमध्ये आहे. हा फोटो पाहून दोघांच्या सुखी संसाराला कोणाची नजर लागलीय, असं अजिबात वाटत नाही.
View this post on Instagram
लग्न कधी झालं?
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचं 2010 साली लग्न झालं होतं. हैदराबादमध्ये हा विवाह झाला. रिसेप्शन लाहोर येथे झालं होतं. शोएब आणि सानियाच्या लग्नावरुन भारतात बरीच टीका टिप्पणी झाली होती. त्यावेळी एका मुलीने शोएबशी आपल्या लग्न झाल्याचा दावा केला होता.