Shoaib Malik | सानियाला सोडून थाटामाटात दुसरं लग्न करणारा शोएब मलिक एकटा पडला, कारण…..
Shoaib Malik | सानिया मिर्झाला घटस्फोट देऊन शोएब मलिकने दुसर लग्न केलं. पण असं करुन शोएब मलिक एकटा पडलाय. सानिया मिर्झाला त्याने घटस्फोट दिल्यानंतर 48 तासात सना जावेदसोबत निकाह केला.
Shoaib Malik | पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिकने वयाच्या 41 वर्षी लग्न केलय. भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाला त्याने घटस्फोट दिल्यानंतर 48 तासात सना जावेदसोबत निकाह केला. सना जावेद पाकिस्तानी अभिनेत्री आहे. या बातमीने सगळेच हैराण झालेत. शोएब मलिकच्या या दुसऱ्या लग्नावर त्याचे कुटुंबीयही खूश नाहीयत. सूत्रांच्या माहितीनुसार, शोएब मलिक आणि सना जावेदच्या लग्नात शोएबचे कुटुंबीय सहभागी झाले नव्हते. शोएब मलिकच्या बहिणींना सुद्धा सानियाला घटस्फोट देण्याचा निर्णय पटलेला नाहीय. कुटुंबीयांनी शोएबला सानियाला घटस्फोट देऊ नको, असा सल्ला दिला होता. पण अखेरीस शोएबने सानियाला सोडलं.
लग्नानंतर सानिया मिर्झा शोएब मलिकच्या अफेअर्समुळे चांगलीच हैराण झाली होती. लग्नानंतर शोएबच नाव अनेक मुली आणि अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. त्यामुळे सानिया मिर्झा चांगलीच हैराण झालेली. दोघांच्या नात्यात या कारणामुळे तणाव निर्माण झाला होता. मागच्या एक-दोन वर्षांपासून दोघे वेगळे होणार अशी चर्चा सुरु झाली होती.
दोघांचा घटस्फोट झालाय का?
शोएब मलिक आणि सानिया मिर्झाचा घटस्फोट झालाय, असं शोएब मलिकच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं. दोघांनी परस्परसहमतीने हे नात संपवलं. घटस्फोट झाल्यानंतरच शोएब मलिकने सना जावेदसोबत लग्न केलं. सनाच सुद्धा हे दुसरं लग्न आहे.
शोएब-सानियाचा मुलगा कुठे राहणार?
शोएब-सानियाच्या घटस्फोटानंतर त्यांचा मुलगा इजहान आता दुबईमध्ये राहील. दोघेही त्याच्या देखभालीचा खर्च उचलतील. शोएब मलिक आणि सना जावेदच्या विवाहाबद्दल सांगायच झाल्यास त्यांनी 18 जानेवारीला कराचीमध्ये निकाह केला. शोएब मलिकचा हा दुसरा विवाह आहे.