दुबईल अलिशान बंगला आणि करोडोंची मालकीन, शोएब पेक्षा श्रीमंत सानिया मिर्झाची संपत्ती किती?

माजी भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा नेहमीच चर्चेत राहिली आहे. पण सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुषामुळे चर्चेत आहे. कारण तिचा शोएब मलिकसोबत घटस्फोट झाला आहे. सानियाने त्याच्यापासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे. असं असलं तरी सानिया त्याच्यापेक्षा श्रीमंत आहे. किती आहे तिची संपत्ती जाणून घ्या.

दुबईल अलिशान बंगला आणि करोडोंची मालकीन, शोएब पेक्षा श्रीमंत सानिया मिर्झाची संपत्ती किती?
Follow us
| Updated on: Jan 27, 2024 | 7:35 PM

Sania mirza : माजी भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिने काही वर्षांआधी माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत विवाह केला होता. तेव्हा देखील अनेक भारतीयांनी तिच्या या निर्णयाविरोधात तिला ट्रोल केले होते. सानिया मिर्झाचा आता घटस्फोट झाला आहे. सानिया मिर्झाने शोएबला खुला दिला आहे. त्यानंतर शोएब मलिकने तिसरा विवाह केला आहे. सना जावेद सोबत विवाह केल्यानंतर शोएबवर पाकिस्तानातूनच टीका केली जात आहे. सानिया मिर्झा जरी शोएबपासून वेगळी झाली असली तरी देखील तिला यामुळे आर्थिक गोष्टीत कोणतीही अडचण येणार नाही. कारण शोएब मलिकपेक्षा ती श्रीमंत आहे.

सानिया मिर्झाची संपत्ती किती?

सानिया ही भारताची सर्वोत्तम खेळाडू आहे. सानियाने आपल्या खेळातून करोडो रुपये कमावले आहेत. त्यामुळे तिच्याकडे करोडोंची संपत्ती आहे. सानियाची आत्तापर्यंतची संपत्ती 26 दशलक्ष डॉलर्स म्हणजे जवळपास 260 कोटी रुपये आहे.  शोएब मलिकची संपत्ती सानियापेक्षा कमी आहे.

सानिया मिर्झाचं दुबईत आलिशान घर

मिळालेल्या माहितीनुसार, सानिया मिर्झाचा दुबईत अलिशान बंगला आहे. या शिवाय हैदराबादमध्ये देखील तिचं अलिशान घर आहे. या दोन्ही घरांची किंमत करोडोंमध्ये आहे. तिच्या हैदराबादमधील घराची किंमत 13 कोटी आहे. सानिया ही अनेक ब्रँडेड कंपन्यांसाठी जाहिरात देखील करते. त्यामुळे तिला दरवर्षी करोडो रुपये मिळतात. सानिया मिर्झाने एक स्पोर्ट्स अकादमीही सुरू केली आहे.

ब्रँडेड कंपन्यांसाठी जाहिरात

सानिया ब्रँडेड कपडे परिधान करते. तिला कुटुंबासोबत परदेशात फिरायला आवडते. तिला एक मुलगा देखील आहे. सानियाचा नेहमीच तिच्या स्टाईलमुळे चर्चेत राहिली. तिचे अनेर फॉलोअर्स आहेत.

एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या माहितीनुसार, सानिया मिर्झाची 2023 मध्ये एकूण संपत्ती 26 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 210 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सानिया मिर्झा ही ब्रँड एंडोर्समेंटसाठी 60 ते 75 लाख रुपये घेते. सानियाचा माजी पती शोएब मलिकच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर त्याच्याकडे 25 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 207 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

शोएब मलिकला दिला घटस्फोट

सानिया मिर्झाने शोएब मलिकला खुला दिला आहे. ज्यामुळे आता दोघेही वेगळे झाले आहेत. शोएब मलिकचे सना जावेदसोबत अफेअर असल्याची बातमी पाकिस्तानातील वृत्तपत्रातून समोर आली आहे. दोघेही गेल्या तीन वर्षापासून एकमेकांसोबत संबंधात आहेत. त्यामुळेच सानिया मिर्झाने त्याला घटस्फोट दिला. शोएबने सना सोबत तिसरा विवाह केला आहे. त्यामुळे पाकिस्तानी लोकं त्याच्यावर टीका करत आहेत.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.