सानिया मिर्झा की शोएब मलिक ? दोघांपैकी अधिक श्रीमंत कोण ?

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा सुरू होती. त्यादरम्यान शोएब मलिकच्या लग्नाचे फोटोच समोर आल्याने एकच खळबळ माजली. त्याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी निकाह केला आहे.

सानिया मिर्झा की शोएब मलिक ? दोघांपैकी अधिक श्रीमंत कोण ?
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 20, 2024 | 1:09 PM

मुंबई | 20 जानेवारी 2024 : गेल्या काही दिवसांपासून टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या वेगळं होण्याबद्दल बऱ्याच चर्चा सुरू होत्या. दोघांनीही घटस्फोट घेतल्याच्याही अनेक बातम्या पसरल्या होत्या. पण सानिया किंवा शोएब यांच्यापैकी कोणीच यावर प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता या चर्चांदरम्यान आता शोएबने थेट दुसऱ्या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. त्याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी निकाह केला आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याने हे फोटो शेअर केले असून सनानेही लग्नाबद्दल पोस्ट केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सानिया मिर्झा गेल्या बऱ्याच काळापासून शोएबपासून वेगळी रहात होती. त्या दोघांनाही इजहान नावाचा एक मुलगा असून तो सानियासोबतच राहतो. सानिया- शोएब यांच्या नात्यात बऱ्याच काळापासून तणाव होता. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट झाल्याचेही बोलले जात होते, पण त्यांपैकी कोणीच यावर प्रतिक्रिया दिली नाही. दोघेही आपापल्या देशातील दिग्गज खेळाडू असून जगभरात प्रसिद्ध आहेत. शोएब मलिक करोडोंच्या मालमत्तेचा मालक आहे पण कमाईच्या बाबतीत सानिया मिर्झाही मागे नाही.

सानिया- शोएब यांची संपत्ती किती आहे, त्यांपैकी अधिक श्रीमंत कोण आहे. त्याबद्दल जाणून घेऊ.

सानिया मिर्झाची कमाई

सानिया मिर्झा सध्या करोडोंची मालक आहे. सानियाची गणना आज जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये केली जाते. गेली अनेक वर्ष टेनिसे खेळत सानियाने भारताचं प्रतिनिधित्व केलं. टेनिस खेळून ती वर्षाला सुमारे 3 कोटी रुपये कमवते. खेळाव्यतिरिक्त, सानिया अनेक ब्रँड एंडोर्समेंटद्वारेही पैसे कमवते. सानिया मिर्झा ही तेलंगणा राज्याची ब्रँड अॅम्बेसेडर आहे आणि ती अनेक टॉप ब्रँड्सशी निगडीत आहे. तसेच ती संयुक्त राष्ट्रांची सदिच्छा दूत देखील आहे आणि हा सन्मान मिळवणारी ती पहिली दक्षिण आशियाई महिला आहे.

खेळातून सानिया वार्षिक 3 कोटी रुपये आणि जाहिरातींमधून 25 कोटी रुपये कमावते. तिचे हैदराबादमध्ये एक आलिशान घर आहे, ज्याची किंमत सुमारे 13 कोटी रुपये आहे. याशिवाय दुबईमध्ही तिचं आलिशान घर असून ते एका बेटावर बांधलं आहे. तिच्या घरात प्रायव्हेट बीचही आहे. सानियाचे स्वतःची टेनिस ॲकॅडमीही आहे. इतर खेळाडूंप्रमाणे सानियालाही आलिशान कारची खूप आवड आहे. सानियाच्या कार कलेक्शनमध्ये रेंज रोव्हर, मर्सिडीज बेंझ, ऑडी, बीएमडब्ल्यू सीरिजच्या कारचा समावेश आहे.

View this post on Instagram

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

सानियाचे नेटवर्थ किती ?

भारतातील सर्वोत्कृष्ट टेनिसपटूंपैकी एक असलेल्या सानिया मिर्झाच्या एकूण संपत्तीबद्दल सांगायचे तर ती सुमारे 25 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 200 कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालक आहे.

शोएब मलिकची एकूण संपत्ती

सानिया मिर्झाप्रमाणेच तिचा पती शोएब मलिकही पाकिस्तानच्या अव्वल खेळाडूंपैकी एक आहे. शोएब मलिकची एकूण संपत्ती जवळपास सानिया मिर्झाच्या बरोबरीची आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शोएबची एकूण संपत्ती 28 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 228 कोटी रुपये आहे. त्याच्या कमाईचा मोठा हिस्सा खेळातून येतो. याशिवाय शोएबला ब्रँड एंडोर्समेंटमधूनही चांगले पैसे मिळतात.

जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.