तरी मी गप्प राहिले..; सानिया मिर्झाच्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घटस्फोटाला तीन महिन्यांहून अधिक काळ उलटला आहे. मात्र आता सानियाने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे पुन्हा एकदा या दोघांची चर्चा सुरू झाली आहे.

तरी मी गप्प राहिले..; सानिया मिर्झाच्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
सानिया मिर्झा, शोएब मलिकImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 02, 2024 | 2:09 PM

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाची सोशल मीडियावर एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकला घटस्फोट दिल्यानंतर सानिया सोशल मीडियावरील पोस्टद्वारे अनेकदा अप्रत्यक्षपणे व्यक्त झाली आहे. त्यामुळे तिने लिहिलेली पोस्ट ही शोएब आणि तिच्या आताच्या परिस्थितीबाबत असू शकते, असा अंदाज नेटकरी बांधतात. बुधवारी सानियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली होती. त्यातील मजकूर वाचल्यानंतर पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी सानियाविषयी सहानुभूती व्यक्त केली आहे. सानियाची ही पोस्ट मोकळेपणे व्यक्त होण्याबद्दलची होती.

‘याआधी मला कधीच इतकी बोलायची इच्छा झाली नव्हती, पण तरी मी थोडंच बोलले. माझ्या मनात खूप काही वाटलं पण तरी मी गप्प राहिले,’ अशा आशयाची ही पोस्ट आहे. सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाला आता जवळपास तीन महिने झाले आहेत. मात्र सानियाच्या या पोस्टमुळे पुन्हा एकदा शोएबसोबतच्या तिच्या नात्याची चर्चा होऊ लागली आहे. सानिया आणि शोएबने 2010 मध्ये हैदराबादमध्ये लग्न केलं होतं. भारत आणि पाकिस्तानात या दोघांचं नातं मोठा चर्चेचा विषय ठरला होता. घटस्फोटानंतरही पुन्हा एकदा ही जोडी दोन्ही देशांमध्ये चर्चेत आली.

सानियाने शेअर केलेली पोस्ट-

हे सुद्धा वाचा

जानेवारी महिन्यात शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी निकाह केला. या निकाहचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर सानियासोबतच्या घटस्फोटाची चर्चा झाली. त्यानंतर सानियाच्या कुटुंबीयांकडून अधिकृत माहिती देण्यात आली की, सानियाने शोएबला ‘खुला’ दिला आहे. घटस्फोटानंतर सानिया तिच्या मुलासोबत दुबईमध्ये राहतेय. या दोघांना इझान मिर्झा मलिक हा मुलगा आहे.

दुसरीकडे शोएब आणि सना हे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. याविषयी पाकिस्तानी पत्रकार नईम हनिफने एका पॉडकास्टमध्ये सांगितलं, “एका टेलिव्हिजन रिॲलिटी शोदरम्यान सना आणि शोएब यांची पहिल्यांदा भेट झाली होती. या शोदरम्यान दोघांची खूप चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. त्यानंतर शोएब जेव्हा कधी टीव्हीवर यायचा, तेव्हा तो सनालाही सोबत आणण्याबद्दल आग्रह करायचा.”

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.