शोएब मलिकशी घटस्फोटानंतर सानिया मिर्झाने या खेळाडूंसाठी शेअर केली ह्रदय असणारी इमोजी

shoaib malik saniya mirza | भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा खेळाडू शोएब मलिक यांच्यात घटस्फोट झाला आहे. शोएबने तिसऱ्यांदा विवाह केला आहे. त्यानंतर आता सानिया मिर्झाने एका भारतीय खेळाडूसाठी ह्रदय असणारी इमोजी शेअर केली आहे.

शोएब मलिकशी घटस्फोटानंतर सानिया मिर्झाने या खेळाडूंसाठी शेअर केली ह्रदय असणारी इमोजी
sania mirza
Follow us
| Updated on: Jan 25, 2024 | 5:14 PM

नवी दिल्ली, दि.25 जानेवारी 2024 | पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक आणि भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा यांच्यात घटस्फोट झाला आहे. चार दिवसांपूर्वी शोएब मलिक याच्या तिसऱ्या लग्नाची बातमी आल्यानंतर या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झाले. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही खेळाडूंच्या घटस्फोटाची चर्चा होतीच. त्याला दुजोरा मिळाला. या घटस्फोटानंतर आता सानिया मिर्झा हिने केलेले एक टि्वट जोरदार व्हायरल झाले आहे. सानिया मिर्झा हिने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) इमोजी शेअर केली आहे. ह्रदय असणारी ही इमोजी शेअर केल्यामुळे चांगलीच व्हायरल झाली आहे.

कोणासाठी केली शेअर केली इमोजी

सानिया मिर्झा हिने ह्रदय असणारी इमोजी टेनिसमधील तिचा सहकारी रोहन बोपन्ना याच्यासाठी शेअर केली. सानिया मिर्झा याने रोहन याचे अभिनंदन केले आहे. ट्विटमध्ये अभिनंदन करताना ह्रदय असणारी इमोजी शेअर केली. सानियाने निळ्या रंगाची इमोजी शेअर केली आहे. ही इमोजी सुरक्षा आणि विश्वासाचे प्रतिक समजली जाते. दोन्ही खेळाडू मिक्स डबलमधील जोडीदार होते. सानियाचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे.

सानिया मिर्झा हिच्या ट्विटनंतर अनेक जणांनी तिच्याबद्दल शोएब प्रकरणाबाबत सहानभूती व्यक्त केली आहे. एका युजरने म्हटले आहे की, सानिया संपूर्ण देश तुझ्या पाठिशी आहे. दुसऱ्या युजरने म्हटले की, राष्ट्राला तुझ्यासंदर्भात अभिमान आहे. एकाने सानिया हिचासोबत तिचा मुलाचा फोटो ट्विट केला आहे आणि म्हटले की हा मुलगा तुला अधिक शक्ती देईल.

२०१० मध्ये झाले होते लग्न

सानिया आणि शोएब मलिक यांचे लग्न २०१० मध्ये झाले होते. १४ वर्षांनंतर दोघांना घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांना एक मुलगा आहे. त्याचे नाव इजहान आहे. शोएब मलिकचे सानियासोबत दुसरे लग्न होते. आता त्याने सानियाला सोडून पाकिस्तानी स्टार सनासोबत तिसरे लग्न केले आहे. 2023 मध्ये सानिया हिची संपत्ती 26 मिलियन डॉलर म्हणजे 210 कोटी रुपये होती.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.