सानिया मिर्झा शोएबच्या आधी बॉलिवूडच्या या अभिनेत्यासोबत होती रिलेशनशिपमध्ये
शोएब मलिकसोबत लग्नाआधी सानिया मिर्झाचे नाव एका बॉलिवूड सुपरस्टारसोबत जोडले गेले होते. सानिया मिर्झाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत विवाह केला होता. पण १३ वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला.
माजी टेनिस स्टार सानिया मिर्झा तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. सानियाने 13 वर्षांपूर्वी हैदराबादमध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत लग्न केले होते. पण त्यांचा आता घटस्फोट झाला आहे. शोएबने तिसरे लग्न केले आहे. पण खुप कमी लोकांना माहितीये की शोएबपूर्वी सानियाचे नाव बॉलिवूडच्या एका सुपरस्टारसोबतही जोडले गेले होते. मात्र, दोघांनीही ते कधीच मान्य केले नाही. सानिया सध्या सिंगल मदर आहे. शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले आहे.
सानिया मिर्झा आणि शाहिद कपूर यांच्या अफेअरची चर्चा काही वर्षांपूर्वी मीडिया वर्तुळात रंगली होती. पण सानियाने शाहीदसोबत ब्रेकअप केल्याचेही म्हटले जाते. कारण ती शाहिदच्या स्वभावामुळे खूप नाराज होती. जेव्हा सानिया मिर्झा एका सेलिब्रिटी टॉक शोमध्ये गेली होती. तेव्हा तिला शोच्या होस्टने शाहिदसोबतच्या तिच्या अफवा असलेल्या नात्याबद्दल विचारले. सानियाने यावेळी त्याला नकार दिला होता. तिने सांगितले होते की, ती खूप प्रवास करते त्यामुळे ती कोणाशीही रिलेशनशिपमध्ये येऊ शकत नाही.
या एपिसोडच्या रॅपिड फायर दरम्यान, जेव्हा सानिया मिर्झाला विचारण्यात आले की रणबीर कपूर, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्यामध्ये तिला कोणासोबत जुळवून घ्यायचे आहे, कोणासोबत लग्न करायचे आहे आणि तिला कोणाला मारायचे आहे. याला प्रत्युत्तर देताना भारतीय टेनिसपटूने सांगितले होते की, तिला रणवीरसोबत हुकअप करायला आवडेल, रणवीर कपूरशी लग्न करायचे आहे आणि शाहिदला मारायचे आहे.
सानिया मिर्झाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी लग्न केले होते. दोघांना इझान नावाचा मुलगाही आहे. पण आता 13 वर्षानंतर सानियाने शोएबसोबत खुला केला आहे. क्रिकेटरच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्समुळे ती नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. शोएबने सना जावेद सोबत लग्न केले.
अभिनेता शाहिद कपूरने मीरा राजपूतशी लग्न केले आहे. दोघांना मीशा आणि जैन ही दोन मुले आहेत. दोघांनी 7 जुलै 2015 रोजी पंजाबी रितीरिवाजानुसार लग्न केले होते. शाहिद कपूर पत्नी मीरापेक्षा 13 वर्षांनी मोठा आहे.