सानिया मिर्झा करणार दुसरा विवाह? शोएबच्या तिसऱ्या लग्नाबाबत ही धक्कादायक भविष्यवाणी

शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्या नात्यात दुरावा आला आहे. त्यामुळे दोघांनी ही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. शोएब मलिकचे सना खानसोबत गेल्या तीन वर्षापासून अफेअर असल्याच्या चर्चा आहेत. एका पाकिस्तानी चॅनेलने हा दावा केला आहे. तिसरं लग्न केल्याने शोएबवरच लोकं टीका करत आहेत.

सानिया मिर्झा करणार दुसरा विवाह? शोएबच्या तिसऱ्या लग्नाबाबत ही धक्कादायक भविष्यवाणी
Follow us
| Updated on: Jan 27, 2024 | 7:36 PM

Sania mirza : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा सध्या तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. सानिया नेहमीच चर्चेत राहिली आहे. कधी ती तिच्या लग्नामुळे तर कधी तिच्या प्रोफेशनमुळे. सानिया मिर्झा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आता चर्चेत आली आहे. सानियाने पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिककडून ‘खुला’ घेतला आहे. यानंतर लगेचच शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत विवाह केला आहे. पण यामुळे पाकिस्तानी लोकांनी त्याला चांगलंच ट्रोल केले आहे. या दरम्यान आता सानिया दुसऱ्यांदा लग्न करणार की नाही याबाबत एक नवा खुलासा समोर आला आहे.

ज्योतिषी पंडित जग्गानाथ गुरुजी यांनी 2022 मध्ये कोईमोई वेबसाईटला एक मुलाखत दिली होती, ज्यामध्ये त्यांनी सानिया आणि शोएब मलिक यांचा विवाह मोडणार असल्याचा दावा केला होता. तो दावा आता खरा ठरला आहे. तिसऱ्या व्यक्तीमुळे त्यांचा संसार मोडेल असं देखील त्यांनी म्हटलं होतं. ती तिसरी व्यक्ती कोणी नसून सना जावेदच असल्याचं लोकं म्हणत आहेत. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोट झाल्यानंतर आता ज्योतिषी पंडित जगन्नाथ यांची आणखी एक भविष्यवाणी चर्चेत आहे.

सानिया दुसऱ्यांदा लग्न करणार!

ज्योतिषी पंडित जगन्नाथ यांनी पुन्हा एकदा सानिया मिर्झा बाबत भविष्यवाणी केली आहे. त्यांनी सांगितले की, सानियाचा सूर्य आणि शनि उज्वल भविष्याकडे बोट दाखवत आहेत. सानियाला तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे त्रास होईल आणि तिच्या मानसिक स्थितीवरही विपरीत परिणाम होईल. पण सूर्य आणि शनिमुळे सानिया सर्व आव्हानांवर मात करेल. पंडितजींनीही आणखी गोष्ट सांगितली आहे. ते म्हणाले की, सानिया पुन्हा एकदा लग्न करू शकते. येत्या 2-3 वर्षात तिचं पुन्हा लग्न होण्याची शक्यता आहे पण तो इतका मोठा निर्णय काळजीपूर्वक घेईल.

शोएबचा पुन्हा घटस्फोट होण्याची शक्यता

पंडित जगन्नाथ यांनी अशीही भविष्यवानी केली आहे की, शोएबचा तिसरा संसार देखील मोडला जावू शकतो. शोएब मलिक आणि सना जावेद यांच्या वैवाहिक जीवनात अनेक चढ-उतार येऊ शकतात. कारण दोघांच्या कुंडलीत मंगळ असल्याने पुढील ३-४ वर्षे त्यांच्या नात्यात अडचणी येऊ शकतात.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....