बहिणीचा किंचाळण्याचा आवाज ऐकून सानिया मिर्झा धावली… घरात नेमकं काय घडलं?
सानिया मिर्झाच्या बहिणी अनमलाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती आणि सानिया, तसेच रॉबिन उथप्पाची पत्नी शीतल, एकत्र दिसत आहेत. अनमलाच्या वेदनांवर सानिया प्रेमाने कशी फुंकर घालतेय हे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ म्हणजे दुबईत राहणाऱ्या या तिघींमधील मैत्री आणि त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांची ही एक झलक आहे.
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा पती शोएब मलिकपासून विभक्त झाली आहे. सध्या ती तिचा मुलगा इझान मिर्झासोबत दुबईत राहते. सानियाच्या आयुष्यात तिच्या मुलगा आणि तिची बहीण अनमला खूप महत्त्वाचे स्थान आहे. सानियाने अनेक प्रसंगी याविषयी ती बोलली आहे. अलीकडेच अनमने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती वेदनांनी ओरडताना दिसत आहे आणि तिची मोठी बहीण सानिया हात धरून तिचे दु:ख हलकं करण्याचा प्रयत्न करत आहे.
कान टोचताना अनमला प्रचंड वेदना
या व्हिडीओमध्ये या दोघांशिवाय एका भारतीय क्रिकेटपटूची पत्नीही या दिसत आहे. अनमने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सानिया मिर्झा आणि भारतीय क्रिकेटर रॉबिन उथप्पाची पत्नी शीतल दिसत आहेत. शीतलही दुबईत राहते. हा व्हिडीओ आहे चौघींनीही कान टोचल्याचा. पण कान टोचताना या तिघींनाही खूप त्रास झाल्याचे दिसून आले.
सानियाची बहिणीच्या वेदनांवर प्रेमाची फुंकर
कान टोचताना शीतल आणि सानियाने कसा तरी त्रास सहन केला पण अनमला खूप वेदना जाणवत होत्या. कान टोचताना अनम फारच जोरात किंचाळली. तेवढ्यात मागे उभी असलेली सानिया पटकन पुढे आली आणि तिने अनमचा हात घट्ट धरून तिला ती शांत करण्याचा प्रयत्न करत होती. अनमने या व्हिडिओवर लिहिले आहे की, “जेव्हा मुली एकत्र रात्र घालवतात तेव्हा काय काय होतं” असं कॅप्शन देत चौघींनी कशी मजा केली हे तिने सांगितले आहे.
View this post on Instagram
रॉबिन उथप्पाची पत्नी शीतल सानियाच्या खूप जवळची आहे. सानियासोबत अनेकदा ती दिसली आहे. सानियाच्या घरी होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात आणि पार्टीत शीतल हजर असते. इतकंच नाही तर रॉबिन उथप्पाचा मुलगा आणि सानिया मिर्झाची मुलगा यांच्यातही घट्ट मैत्री आहे. दरम्यान घटस्फोटानंतर सानियाचा पती शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केले. सोशल मीडियावर लग्नातील काही फोटो शेअर केले. शोएबचे हे फोटो पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.