SA vs IND: सेंच्युरियनमधल्या पावसामुळे कुठल्या संघाला होईल फायदा? जाणून घ्या पीच रिपोर्ट
भारत आणि दक्षिण आफ्रिकेत (SAvsIND) सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये पावसाचा खेळ सुरु आहे. पावसामुळे अजून दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होऊ शकलेला नाही.
सेंच्युरियन: भारत आणि दक्षिण आफ्रिकेत (SAvsIND) सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये पावसाचा खेळ सुरु आहे. पावसामुळे अजून दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होऊ शकलेला नाही. आज खेळ सुरु झाल्यास गोलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होऊ शकतो. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी परिस्थितीचा फायदा उचलला तर ते अधिक धारदार गोलंदाजी करु शकतात.
पिच रिपोर्ट काय सांगतो सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट पार्कची खेळपट्टी वेगवान गोलंदाजीसाठी अनुकूल आहे. खेळपट्टीवर चेंडूला मिळणारी उसळी आणि स्विंगमुळे फलंदाजांच्या अडचणी वाढू शकतात. फलंदाज खेळपट्टीवर टिकून राहिले, त्यांनी खेळपट्टीचा नूर ओळखला, तर मात्र त्यांचे काम सोपे होऊ शकते. काल भारतीय सलामीवर मयांक अग्रवाल आणि केएल राहुलने हेच तंत्र वापरले. खेळपट्टीवर आधी जम बसवला नंतर सावध आणि संयमी फलंदाजी करुन धावा जमवल्या. मैदानावरील आऊटफिल्डला गती आहे. फलंदाज चांगला फटका खेळला तर चेंडू सहज सीमारेषेपार जाईल.
वेदर फोरकास्ट कसोटीच्या पहिल्या दोन दिवसात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पहिल्या दोन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता 60 टक्के वर्तवण्यात आली आहे. काल पावसाचा व्यत्यय आला नाही. पण आज पावसामुळे पहिल्या सत्राचा खेळ होऊ शकला नाही. कसोटीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सुर्यदर्शन होईल.