Shoaib Akhtar | दोन मुलांनंतर शोएब अख्तर याला कन्या रत्न, भावूक पोस्ट करत म्हणाला…

Shoaib Akhtar | लग्नाच्या 10 वर्षांनंतर शोएब अख्तर याला कन्या रत्न... दोन मुलांनंतर मुलगी होताच भावूक पोस्ट करत म्हणाला..., प्रचंड खान आहे माजी क्रिकेटपटूच्या लेकीचं नाव.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शोएबच्या लेकीची चर्चा...

Shoaib Akhtar  | दोन मुलांनंतर शोएब अख्तर याला कन्या रत्न, भावूक पोस्ट करत म्हणाला...
Follow us
| Updated on: Mar 02, 2024 | 10:26 AM

मुंबई | 2 मार्च 2024 : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) वायाच्या 48 व्या वर्षी तिसऱ्यांदा बाप झाला आहे. दोन मुलांच्या जन्मानंतर शोएब याच्या घरात चिमुकलीचं स्वागत झालं आहे. शोएबची पत्नी रुबाब खान हिने 1 मार्च रोजी गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सांगायचं झालं तर, 2014 मध्ये शोएब अख्तर आणि रुबाब खान यांनी लग्न केलं. लग्नाच्या 10 वर्षांनंतर शोएब अख्तर आणि रुबाब खान यांच्या आयुष्यात मुलीची एन्ट्री झाली आहे.

शोएब याने लेकीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत. शिवाय शोएबने लेकीच्या नावाची देखील घोषणा केली आहे. शोएब अख्तर याने त्याच्या लेकीचं नाव नूरेह अली अख्तर असं ठेवलं आहे. लेक नूरेह हिचा गोंडस फोटो पोस्ट करत शोएबने ‘अल्लाह तालाने आम्हाला एका मुलीचा आशीर्वाद दिला आहे…’

शोएब अख्तर म्हणाला, ‘मिकायल आणि मुजद्दिद यांची आता एक बहीण आहे. अल्लाह तालाने आम्हाला एका मुलीचा आशीर्वाद दिला आहे. आम्ही नूरेह अली अख्तर हिचं स्वागत करत आहोत. जी जुम्मा नमाजीच्या वेळी जन्माला आली. 1 मार्च, 2024 रोजी जन्म झाला.’ सध्या सोशल मीडियावर शोएब याच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

मुलीच्या जन्मानंतर फक्त चाहते नाही तर, सेलिब्रिटी देखील शोएब याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सांगायचं झाल तर, शोएब आणि रुबाब यांना दोम मुलं आहे. त्यांच्या पहिल्या मुलाचं नाव मोहम्मद मिकाइल अली आणि दुसऱ्या मुलाचं मोहम्मद मुजद्दिद अली असं आहे.

शोएब आणि रुबाब यांनी 2014 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर 2016 मध्ये शोएब आणि रुबाब यांनी मोठा मुलगा मोहम्मद मिकाइल अली याला जन्म दिला. त्यानंतर 2019 मध्ये दोघांनी दुसरा मुलगा मोहम्मद मुजद्दिद अली याला जन्म दिला. लग्नाच्या 10 वर्षांनंतर आणि दोन मुलांच्या जन्मानंतर शोएब अख्तर याने लेकीचं स्वागत केलं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.