Champions Trophy 2025 : 5 टुर्नामेंटमध्ये 1341 धावा, परफॉर्मन्स असा की, टीम इंडियात तो पुन्हा येणार

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची निवड होईल, त्यावेळी एका खेळाडूची निवड टीममध्ये पक्की मानली जात आहे. देशातंर्गत क्रिकेटमधील पाच टुर्नामेंटसमध्ये त्याने अक्षरक्ष: धावांचा पाऊस पाडलाय. त्याने प्रत्येक फॉर्मेटमध्ये आपली क्षमता सिद्ध केलीय.

Champions Trophy 2025 : 5 टुर्नामेंटमध्ये 1341 धावा, परफॉर्मन्स असा की, टीम इंडियात तो पुन्हा येणार
Team India
Follow us
| Updated on: Jan 07, 2025 | 1:44 PM

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा बिगुल पुढच्या महिन्यात वाजणार आहे. 19 फेब्रुवारीपासून टुर्नामेंट सुरु होणार आहे. यासाठी 12 जानेवारी ही टीमची घोषणा करण्याची अंतिम तारीख आहे. या ICC टुर्नामेंटसाठी भारतीय टीमची घोषणा सुद्धा लवकर होऊ शकते. पण प्रश्न हा आहे की, कुठल्या खेळाडूंना संधी मिळणार?. देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त प्रदर्शन करणाऱ्या एका खेळाडूसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले जाऊ शकतात. 5 टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत त्याने 1341 धावा फटकावल्या आहेत. या खेळाडूच नाव आहे श्रेयस अय्यर. आधी इंजरी आणि खराब फॉर्मचा त्याने सामना केला. पण देशांतर्गत सीजन 2024-25 मध्ये तो धडाकेबाज प्रदर्शन करतोय.

व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यर टीम इंडियाचा फर्स्टच लाइनमधला खेळाडू आहे. सध्या तो ज्या फॉर्ममध्ये आहे, ते पाहता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी त्याची टीम इंडियात निवड पक्की मानली जातेय. श्रेयस अय्यर सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळतोय. या स्पर्धेत त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. त्याची सरासरी आणि शतकांवर नजर टाकली की, त्याच्या भन्नाट फॉर्मची कल्पना येते.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये जबरदस्त प्रदर्शन

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत श्रेयस अय्यरने आतापर्यंत एकूण पाच सामन्यात पाच डावात 325 च्या सरासरीने 325 धावा ठोकल्या आहेत. या दरम्यान त्याने 2 शतकं झळकावली आहेत. विजय हजारे ट्रॉफीमध्ये 137 धावा त्याचा बेस्ट स्कोर आहे.

रणजीमध्ये कसा परफॉर्मन्स?

फक्त हीच टुर्नामेंट नाही, अन्य स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये सुद्धा श्रेयस अय्यरचा असाच फॉर्म दिसून आलाय. रणजी ट्रॉफी स्पर्धेत चार सामन्यात पाच इनिंगमध्ये 90.40 च्या सरासरीने त्याने 452 धावा फटकावल्या आहेत. यात दोन सेंच्युरी आहेत. या दोन शतकांमध्ये एक डबल सेंच्युरी आहे.

345 रन्स फटकावल्या

रणजी शिवाय सैयद मुश्ताक अली टूर्नामेंटमध्ये 8 इनिंगमध्ये त्याने 188.52 च्या स्ट्राइक रेटने 345 रन्स फटकावल्या आहेत. या दरम्यान एक शतक आणि एक अर्धशतक झळकावलं आहे. श्रेयस अय्यरने दुलीप ट्रॉफी स्पर्धेत 3 सामन्यात 154 धावा, इराणी ट्रॉफीच्या एक मॅचमध्ये 65 धावा केल्या आहेत. त्याने या दोन्ही टुर्नामेंटमध्ये शतक झळकावलं नाही.

निवडीसाठी प्रबळ दावेदार

देशांतर्गत क्रिकेटमधील या पाच स्पर्धांमधील श्रेयस अय्यरच्या एकत्र धावा जोडल्या तर एकूण टोटल 1341 धावा होते. ही संख्या आणखी वाढू शकते. कारण श्रेयस विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळतोय. विजय हजारे ट्रॉफी व्हाइट बॉल टुर्नामेंट आहे. या स्पर्धेतील त्याची कामगिरी पाहिली, तर तो 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत निवड होण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.