Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shubman Gill च्या सेंच्युरीने आता रडत असेल Pathaan, शाहरुख खानने का केली अशी चूक?

शुभमनने अहमदाबाद टी 20 मध्ये 63 चेंडूंमध्ये नाबाद 126 धावा केल्या. या धडाकेबाज खेळीनंतर प्रत्येक क्रिकेट एक्स्पर्ट, खेळाडू आणि चाहते त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. मात्र या सर्वांत अशी एक व्यक्ती असेल, ज्याला शुभमनच्या या खेळीनंतर पश्चात्ताप होत असेल.

Shubman Gill च्या सेंच्युरीने आता रडत असेल Pathaan, शाहरुख खानने का केली अशी चूक?
Shah Rukh Khan and Shubman GillImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 4:10 PM

अहमदाबाद: शुभमन गिलने त्याच्या दमदार फलंदाजीने सर्वांची मनं जिंकली आहेत. वनडे मॅचमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर आता शुभमनने टी 20 क्रिकेटमध्येही आपली विशेष छाप सोडली आहे. टी 20 इंटरनॅशनलमध्ये गिलने न्यूझीलँडविरोधात सेंच्युरीचा शुभारंभ केला. शुभमनने अहमदाबाद टी 20 मध्ये 63 चेंडूंमध्ये नाबाद 126 धावा केल्या. या धडाकेबाज खेळीनंतर प्रत्येक क्रिकेट एक्स्पर्ट, खेळाडू आणि चाहते त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. मात्र या सर्वांत अशी एक व्यक्ती असेल, ज्याला शुभमनच्या या खेळीनंतर पश्चात्ताप होत असेल. एक अशी टीम आहे ज्यांना शुभमनची किंमत समजली नाही आणि आता त्यांना वाटत असेल की आपल्याच पायावर आपण धोंडा मारून घेतला आहे.

ही टीम आहे आयपीएलची कोलकाता नाइट राइडर्स टीम आणि त्याचा मालक आहे शाहरुख खान. सध्या शाहरुखचा ‘पठाण’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. तर दुसरीकडे शुभमन गिल हा क्रिकेट विश्वातला पठाण ठरतोय. शुभमन हा आयपीएलच्या 14 व्या सिझनपर्यंत शाहरुखची टीम केकेआरचा एक भाग होता. मात्र आयपीएल 2022 च्या आधी त्याला टीममधून रिलीज करण्यात आलं.

हे सुद्धा वाचा

शुभमन गिलला केकेआर समजू शकली नाही?

शुभमन गिल 2018 मध्ये कोलकाता नाइट राइडर्सशी जोडला गेला होता. पहिल्या दोन सिझनमध्ये त्याने ठिकठाक कामगिरी केली. मात्र नंतर 2020 आणि 2021 मध्ये त्याने केकेआरसाठी 400 हून अधिक धावा केल्या. यावेळी शुभमनचा स्ट्राइक रेट 120 पेक्षाही कमी होता. त्यामुळे केकेआरने मोठा निर्णय घेत त्याला आयपीएल 2022 च्या लिलावाआधीच रिलीज केला. त्यानंतर शुभमनची गुजरात टाइटन्समध्ये एण्ट्री झाली आणि 16 सामन्यांमध्ये त्यने 483 धावा केल्या. त्यावेळी शुभमनचा स्ट्राइक रेट 130 पेक्षा अधिक होता आणि तेव्हापासून त्याने पुन्हा मागे वळून पाहिलं नाही.

वनडेनंतर आता टी 20 मध्ये शुभमनची धडाकेबाज कामगिरी

शुभमन गिलने गेल्या एक महिन्यात चार शतकं ठोकली आहेत. गिलने श्रीलंकेच्या विरोधात तिरुवनंतरपुरममध्ये 116 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने न्यूझीलँडविरोधात हैदराबादमध्ये 208 धावा केल्या. इंदौरमध्येही त्याने 112 धावा करत दमदार कामगिरी केली. आता अहमदाबादमध्ये त्याने नाबाद 126 धावा केल्या आहेत.

  • शुभमन गिलने गेल्या 7 सामन्यांमध्ये 4 शतकं ठोकली आहेत.
  • गिलने 124 च्या सरासरीने 620 धावा केल्या.
  • शुभमनचा स्ट्राइक रेट 136 पेक्षा जास्त आहे.
  • गिलने 23 षटकार आणि 67 चौकार मारले आहेत.

या आकड्यांवरून हे स्पष्ट होतंय की शुभमन गिल आता एका वेगळ्या स्तराचा खेळाडू बनला आहे. त्याचा स्ट्राइक रेटही उत्तम आहे आणि कोलकाता नाइट राइडर्सने त्याला रिलीज करून मोठी चूक केली आहे.

कोलकाताने याआधीही केली अशी चूक

शाहरुख खानच्या कोलकाता नाइट राइडर्सने शुभमन गिलच्या आधी सूर्यकुमार यादवला समजण्यातही अशीच चूक केली होती. सूर्यकुमार यादव हा तीन वर्षांपर्यंत कोलकाताच्या टीममध्ये होता. तो या टीमचा उपकर्णधारसुद्धा राहिला होता. मात्र 2018 मध्ये त्याला टीमने रिलीज केलं आणि त्यानंतर तो मुंबई इंडियन्समध्ये सहभागी झाला. या टीममध्ये सूर्यकुमारने उत्तम कामगिरी केली.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.