चमत्कार की थट्टा? 11 फलंदाजांचं द्विशतक, एकाच गोलंदाजाला 11 विकेट

पाकिस्तानकडून राष्ट्रीय स्तरावरच्या टी-२० स्पर्धेचा घाट घालण्यात असला तरी हे प्रकरण त्यांना फारसे झेपलेले नाही.

चमत्कार की थट्टा? 11 फलंदाजांचं द्विशतक, एकाच गोलंदाजाला 11 विकेट
Follow us
| Updated on: Oct 07, 2020 | 2:11 PM

नवी दिल्ली: सध्या भारतीय प्रेक्षक इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL) क्रिकेट सामन्यांचा आनंद लुटत आहेत. आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात क्रीडाप्रेमींना रोमहर्षक क्षण अनुभवायला मिळत आहेत. तसेच यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक नवनवे विक्रमही रचले जात आहेत. मात्र, पाकिस्तानमध्ये या सगळ्या विक्रमांना मागे टाकेल, असा एक प्रकार समोर आला आहे. पाकिस्तानात सध्या नॅशनल क्रिकेट टी-२० कप (Pakistan National T20 Cricket Cup) सुरु आहे. या स्पर्धेत एकाच संघातील ११ खेळाडूंनी डबल सेंच्युरी झळकावल्याचा आणि एकाच गोलंदाजाने ११ बळी घेतल्याचे काही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर नुकतेच व्हायरल झाले होते. साहजिकच असा अनोखा विक्रम पाहून सुरुवातीला अनेकजण बुचकाळ्यात पडले होते. (Major blunder in Paksitan national T20 cup coverage)

मात्र, क्रीडाप्रेमींनी हे रेकॉर्डस बारकाईने पाहिल्यानंतर सारा घोळ उघड झाला. पाकिस्तानकडून राष्ट्रीय स्तरावरच्या टी-२० स्पर्धेचा घाट घालण्यात असला तरी हे प्रकरण त्यांना फारसे झेपलेले नाही. त्यामुळे याठिकाणी आयोजनापासून प्रत्येक पातळीवर सावळागोंधळ निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वीच या स्पर्धेतील सामना सुरु असताना मैदानातील फ्लड लाईटस बंद पडल्या होत्या.

हा प्रकार ताजा असतानाच आता एका सामन्यातील धावफलक लिहताना अक्षम्य घोळ घालण्यात आल्याची घटना घडली आहे. या धावफलकावर नजर टाकल्यास संघातील ११ खेळाडूंच्या जागी हाशिम आमला या एका खेळाडुचेच नाव दिसत आहे. कहर म्हणजे या सर्वांनी २०० चेंडूत २०० धावा केल्याचे धावफलकावर दिसत आहे. तसेच या सर्वांना अजहरुद्दीन या एकाच गोलंदाजाने बाद केले आहे. पाकिस्तानी टी-२० स्पर्धेतील हा सर्व प्रकार पाहून क्रीडाप्रेमींना हसावे की रडावे, हेच समजेनासे झाले आहे.

अंपायरिंगमध्येही मोठा गोंधळ सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रांमध्ये अंपायर्सकडून झालेली चूक दिसत आहे. फलंदाजाने सिक्स मारल्याचे स्क्रीनवर स्पष्टपणे दिसत असताना पंचांकडून मात्र चौकार मारल्याचा इशारा दिला जात आहे. त्यामुळे अनेकजण पाकिस्तानी टी-२० स्पर्धेची खिल्ली उडवत आहेत.

संबंधित बातम्या:

Mankading | पहिलं आणि शेवटचं सांगतोय, नंतर मंकडिंगसाठी बोल लावू नका, अश्विनची फलंदाजांना तंबी

धोनीच्या नावावर नवा विक्रम, हैदराबादविरुद्ध मैदानात उतरताच विक्रमाची नोंद

(Major blunder in Paksitan national T20 cup coverage)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.