Champions Trophy 2025 : PCB टेन्शनमध्ये, पाकिस्तानातील ‘या’ मॅचवर दक्षिण आफ्रिका बहिष्कार घालणार का?

Champions Trophy 2025 : चॅम्पिन्स ट्रॉफीच्या हायब्रिड मॉडलमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आधीच हैराण आहे. एक सेमीफायनल आणि भारताचे सर्व सामने दुबईत शिफ्ट झालेत. आता दक्षिण आफ्रिकाही पाकिस्तानातील एका मॅचवर बहिष्कार घालणार अशी चर्चा आहे.

Champions Trophy 2025 : PCB टेन्शनमध्ये, पाकिस्तानातील 'या' मॅचवर दक्षिण आफ्रिका बहिष्कार घालणार का?
Champions Trophy 2025Image Credit source: Getty/PCB
Follow us
| Updated on: Jan 10, 2025 | 11:38 AM

खूप वादविवाद, अडचणींनंतर चॅम्पिन्स ट्रॉफी स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. पाकिस्तानला या स्पर्धेच यजमानपद मिळालं आहे. टुर्नामेंटच्या हायब्रिड मॉडलमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चिंतेमध्ये आहे. पण अडचणी इथे संपत नाहीयत. भारताचे सामने आधीच दुबईत शिफ्ट झालेत. आता पाकिस्तानात होणारा आणखी एक सामना बायकॉट करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. दक्षिण आफ्रिकेचे क्रीडा मंत्री गेटन मॅकेंजी यांनी आपल्या क्रिकेट बोर्डाला अफगाणिस्तान विरुद्ध सामना न खेळण्याच आवाहन केलं आहे. त्यांनी SA बोर्डाला या सामन्याच विरोध करण्याच अपील केलं आहे. या टुर्नामेंटमध्ये अफगाणिस्तानचे सर्व सामने पाकिस्तानात होणार आहेत.

दक्षिण आफ्रिकेचे क्रीडा मंत्री म्हणाले की, ” एका अशा कम्युनिटीमधून येतो, ज्यांना वर्णभेद असताना क्रीडा क्षेत्रात संधी नाकारली जात होती. त्यामुळे अशी गोष्ट आता दुसऱ्या देशात होत असताना त्याला विरोध न करणं हा दुटप्पीपणा आणि अनैतिक असेल” अफगाणिस्तानात महिलांच्या खेळण्यावर बंदी आहे. त्याबद्दल विरोध दर्शवण्यासाठी ते अफगाणिस्तान विरुद्ध मॅच खेळू नका असं सांगत आहेत.

मजबूत भूमिका घेतील अशी अपेक्षा

गेटन मॅकेंजी यांनी फक्त आपल्या बोर्डालाच नाही, तर आयसीसी आणि अन्य क्रिकेट बोर्डांना सुद्धा या विषयात कारवाई करण्याच अपील केलय. “क्रिकेटच्या खेळातून जगाला काय संदेश मिळणार? याचा आयसीसी आणि दुसऱ्या देशाच्या संस्थांनी विचार केला पाहिजे. खासकरुन महिलांबद्दल काय दृष्टीकोन आहे. या खेळाशी जोडलेले सर्व समर्थक, खेळाडू आणि अधिकारी अफगाणिस्तानातील महिला खेळाडूंच्या समर्थनासाठी एक मजबूत भूमिका घेतील” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आणखी एक सामन्याच नुकसान पीसीबीला भारी पडेल

दक्षिण आफ्रिकेच्या क्रीडा मंत्र्यांच्या अपीलनंतर पीसीबीच टेन्शन वाढलय. असं झाल्यास पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच मोठ नुकसान होऊ शकतं. त्याचा कमाईवर परिणाम होईल. आधीच 15 पैकी भारताचे तीन सामने आणि एक सेमीफायनल मॅच दुबईमध्ये शिफ्ट केलीय. त्यात टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचल्यास तो सामना सुद्धा दुबईतच होईल. अशात आणखी एक सामन्याच नुकसान पीसीबीला भारी पडेल.

हा अधिकार त्यांच्याकडे नाहीय

मॅचवर बहिष्कार घालण्याचा अधिकार दक्षिण आफ्रिकेच्या क्रीडा मंत्र्यांना नाहीय. मॅकेंजी यांनी स्वत: सांगितलं की, हा अधिकार त्यांच्याकडे नाहीय. हा निर्णय फक्त बोर्ड आणि सरकार घेऊ शकतं. दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्ड आणि त्यांच्या सरकारची सध्या यावर कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.