पुणे बॉईज स्पोर्टस संस्थेत प्रवेश घेण्यासाठी 4 ऑक्टोबरपासून क्रीडा चाचण्या
पुणे बॉईज स्पोर्टस संस्थेत प्रवेश घेण्यासाठी नाशिक येथे येत्या 4 ऑक्टोबरपासून क्रीडा चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिकः पुणे बॉईज स्पोर्टस संस्थेत प्रवेश घेण्यासाठी नाशिक येथे येत्या 4 ऑक्टोबरपासून क्रीडा चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे आणि आर्मी स्पोर्टस संस्थेच्या वतीने या जिल्हास्तरीय चाचण्या घेण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी दिली.
पुणे बॉईज स्पोर्टस ही नामवंत क्रीडा संस्था आहे. येथे प्रवेश घेण्यासाठी अनेक जण इच्छुक असतात. त्यासाठी 4 ते 8 ऑक्टोबर दरम्यान जिल्हास्तरीय नैपुण्य चाचण्या होत आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील खेळाडूंनी डायव्हिंग, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, कुस्ती, तलवारबाजी, वेटलिप्टींग या खेळाच्या चाचण्यांमध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. लहान वयात मुलांना क्रीडा विषयक प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय व ऑलंम्पिक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावंत खेळाडूंची निवडकरून त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार व अद्ययावत क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुसंघटीत प्रयत्न जिल्हा क्रीडा विभागामार्फत करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने या नैपुण्य चाचण्यांचे आयोजन विभागीय क्रीडा संकुल हिरावाडी, पंचवटी येथे आयोजन करण्यात आले आहे. डायव्हिंग या खेळासाठी वोमर्यादा 8 ते 12 असून, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, कुस्ती, तलवारबाजी, वेटलिप्टींग या खेळांसाठी वयोमर्यादा 10 ते 14 असणार आहे.
हे प्रमाणपत्र असणे गरजेचे
चाचण्यांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संबंधित खेळाडूंकडे खेळाचे प्रमाणपत्र व जन्म दाखला असणे आवश्यक असून, 1 जानेवारी 2022 रोजी खेळाडूचे वय 8 ते 14 असणे आवश्यक आहे. संबंधित खेळाच्या नैपुण्य चाचणीत भाग घेण्यासाठी खेळाडूंनी खेळाच्या प्रकारानुसार त्यादिवशी सकाळी 08.30 या वेळेत उपस्थित रहाणे बंधनकारक असून, या संबंधित अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक राजेश क्षत्रिय यांच्याशी संपर्क साधवा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी आवाहन केले आहे.
असे असेल नैपुण्य चाचण्यांचे वेळापत्रक
– ॲथलेटिक्स – 04 ऑक्टोबर 2021 – वॉकींग – 04 ऑक्टोबर 2021 – बॉक्सिंग – 06 ऑक्टोबर 2021 – तलवारबाजी – 06 ऑक्टोबर 2021 – कुस्ती – 07 ऑक्टोबर 2021 – अर्चरी – 07 ऑक्टोबर 2021 – वेटलिप्टींग – 08 ऑक्टोबर 2021 – डायव्हिंग – 08 ऑक्टोबर 2021
पुणे बॉईज स्पोर्टस संस्थेत प्रवेश घेण्यासाठी नाशिक येथे येत्या 4 ऑक्टोबरपासून क्रीडा चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे. विभागीय क्रीडा संकुल हिरावाडी, पंचवटी येथे या चाचण्या होतील. डायव्हिंग या खेळासाठी वोमर्यादा 8 ते 12 असून, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, कुस्ती, तलवारबाजी, वेटलिप्टींग या खेळांसाठी वयोमर्यादा 10 ते 14 असणार आहे. – रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी
इतर बातम्याः
ओ शेट, नाद कराच; स्वस्तातलं सोनं घ्यायची संधी हुकवू नका!
भुजबळांच्या नावे पुन्हा खणखणले धमकीचे फोन; जिल्हाधिकाऱ्यांच्याही नावाचा वापर
(Sports tests from October 4 for admission in Pune Boys Sports Institute)