LIVE मॅचमध्ये स्टार बॉक्सरचा मृत्यू, मूसा युमकला रिंगमध्ये आला हार्ट अटॅक, आत्तापर्यंत एकही सामना हरला नव्हता.
या मॅचमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये वांडेराकडून मूसाला जबरदस्त हिट मिळाली होती, त्यानंतर मुसाची काही काळ शुद्ध गेली होती आणि तो रिंगमध्ये अडखळत चालत होता. या दुर्घटनेनंतर त्याला तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत बराच उशीर झालेला होता.
न्यूयॉर्क– तुर्कीचा ३८ वर्षांचा स्टार बॉक्सर (Star Boxer) मूसा यमक (Musa Yamak) याचा रिंगमध्ये हार्ट अटॅक आल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी न्यूयॉर्कमध्ये हमजा वंडेरा याच्याविरोधात त्याचा मुकाबला सुरु होता. याच मॅचमध्ये तिसऱ्या राऊंडमध्ये (Death in boxing ring)अचानक तो बेशुद्ध पडला. तुर्कीचे अधिकारी हसन तुरान यांनी मूसाच्या निधनाबद्दल ट्विट करत तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी लिहिले आहे की – आम्ही आमच्या वतनातील मूसा अस्कान यमक याला आज हरवून बसलेलो आहोत. जे अलुक्राचे एक बॉक्सर होते.
Avrupa ve Asya şampiyonlukları olan Alucralı boksör hemşehrimiz Musa Askan Yamak’ı bir kalp krizi sonrasında genç yaşında kaybettik. Daha önce müsabaka için Ankara’ya geldiğinde TBMM’de görüştüğümüz merhuma Allah’tan rahmet, kederli ailesine ve sevenlerine başsağlığı diliyorum. pic.twitter.com/KXhiMeBoA2
हे सुद्धा वाचा— Hasan Turan ???? (@hasanturantr) May 15, 2022
नेमकं काय घडलं
मूसाने खूप कमी वयात बॉक्सिंगमध्ये मोठी घौडदौड केली होती. कमी वयात युरोपीय आणि अशियाई चॅम्पियनशीप जिंकण्याचा विक्रम त्याच्या नावावर होता. मूसा यमक आणि हमजा वांडेरा यांची मॅच लाईव्ह सुरु होती. या मॅचच्या दरम्यानच तिसरा राऊंड सुरु होण्याच्या काही क्षणांपूर्वी यमक रिंगमध्ये कोसळून पडला.
दुसऱ्या राऊंडमध्ये मिळाली होती मोठी हिट
या मॅचमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये वांडेराकडून मूसाला जबरदस्त हिट मिळाली होती, त्यानंतर मुसाची काही काळ शुद्ध गेली होती आणि तो रिंगमध्ये अडखळत चालत होता. या दुर्घटनेनंतर त्याला तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत बराच उशीर झालेला होता. डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर त्याला मृत जाहीर केले.
नॉकआऊटमध्ये ८–० असा होता रेकॉर्ड
मूसाने आत्तापर्यंत एकही नॉकआऊट मॅच हरलेली नव्हती. त्याचा रेकॉर्ड ८–० असा होता. २०१७ साली मुसा बॉक्सर म्हणून नावारुपाला आला होता. २०२१ साली इंटरनॅशनल चॅम्पियन झाल्यानंतर त्याचा चाहतावर्गही निर्माण झाला होता.
रशियन बॉक्सरचाही झाला होता असाच अंत
गेल्या वर्षी २६ डिसेंबर रोजी रिंगमध्ये इगोर सेमरनिनच्या विरोधात मुकाबल्यात, अरेस्ट सहक्यान याच्या डोक्याला जखम झाली होती, त्यानंतर तो नॉकआऊट झाला होता. जखम एवढी गंभीर होती की त्यानंतर तो कोमात गेला होता. या मॅचनंतर १० दिवसांनी त्याचा मृत्यू झाला होता.
या मॅचमध्ये आठवड्या राऊंडमध्ये प्रतिस्पर्ध्याने उजव्या बाजूने एक शॉट मारला होता, त्यानंतर सहक्यान रिंगमध्येच खाली पडला होता. केवळ २६ वर्षे वयाच्या या बॉक्सरला त्यानंतर रिंगमधून थेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. सेमरनिन याच्या पंचमुळे सहक्यान याच्या डोक्यात गभीर जखम झाली होती. त्यानंतर त्याची तातडीने सर्जरी करण्यात आली. मात्र डॉक्टरांनी बरेच प्रयत्न करुनही त्याला वाचवता येऊ शकले नाही.