भारतीय फुटबॉलपटूची कमाल, गोल्समध्ये मेस्सीला मागे टाकलं
सुनील छेत्रीने (Sunil Chhetri) केलेल्या दोन गोल्सच्या जोरावर भारताने बांग्लादेशला 2-0 ने पराभूत करत फीफा विश्वचषक 2022 च्या क्वॉलीफायर्समध्ये पहिला विजय मिळवला आहे.
कतार : जगातील एक प्रसिद्ध आणि प्रमुख खेळ असणाऱ्या फुटबॉलमध्ये भारत बराच पिछाडीवर आहे. भारतीयांमध्ये फुटबॉलबद्दल जास्त प्रसिद्धी नसल्याने हा खेळ अधिक खेळला जात नाही. मात्र पूर्वी भाईचूंग भूतिया (Bhaichung Bhutia) आणि सध्याचा कर्णधार सुनिल छेत्री (Sunil Chetri) यांनी भारतीय फुटबॉलला काही प्रमाणात प्रसिद्ध नक्कीच केलं आहे. दरम्यान छेत्रीने आता आणखी एक माईलस्टोन गाठत जगातील अव्वल क्रमाकांचा फुटबॉलर लिओनल मेस्सीला (Liones Messi) मागे टाकले आहे. सध्या सक्रिय खेळाडूंमध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक गोल करण्यात छेत्री मेस्सीच्या पुढे गेला आहे. फिफा विश्वचषकाच्या क्वॉलीफायर सामन्यात बांग्लादेशला 2-0 ने नमवताना छेत्रीने केलेले दोन गोल महत्त्वाचे ठरले. (Sunil Chetri Becomes First Indian to Hit More International Goals than Leonal Messi)
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने सोमवारी झालेल्या बांग्लादेशविरोधातील सामन्यात दोन गोल लगावले. या दोन गोल्समुळे आंतरराष्ट्रीय सामन्यांत केलेल्या छेत्रीच्या गोल्सची संख्या 74 झाली. ज्यामुळे छेत्री मेस्सीला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. मेस्सीच्या नावावर सध्या 72 गोल्स असून पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) 103 गोल्ससह प्रथमस्थानी आहे. या रेकॉर्डसोबतच छेत्रीने आणखी एक विशेष विक्रम आपल्या नावे केला आहे. तो पहिला भारतीय खेळाडू बनला आहे ज्याने तिन्ही दशकात देशासाठी गोल लगावले आहेत. त्याने 2004 साली भारतीय संघात पदार्पण केलं तेव्हापासून तो आतापर्यंत देशासाठी खेळत असून प्रत्येक सामन्यात महत्त्वाची कामगिरी पार पाडतो.
छेत्रीची धडाकेबाज कामगिरी
भारतीय संघात 2004 मध्ये पदार्पणानंतर छेत्रीने पहिला गोल कंबोडिया विरोधात 2007 मध्ये केला. आतपर्यंत छेत्री 117 सामने खेळला असून त्यात त्याने 74 गोल लगावले आहेत. सध्या छेत्री भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू असून कर्णधारपदाची धुरा एकहाती सांभाळतो. सध्या देखील 2022 फिफा विश्वचषकाचे क्वॉलीफायर सामने सुरु आहेत ज्यात छेत्री भारतीय संघाला जिंकवून देण्यासाठी जीवाचं रान करत आहे. त्याने सोमवारी देखील बांग्लादेशविरोधात 79 आणि 92 व्या मिनिटाला गोल करत सामना जिंकवून दिला.
हे ही वाचा –
तिन्ही लीगमध्ये रोनाल्डोचाच डंका! इंग्लंड, स्पेन गाजवल्यानंतर आता इटलीतही रोनाल्डोची यशस्वी वाटचाल
देशाला वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी 39 वर्षीय खेळाडू मैदानात, निवृत्तीच्या 5 वर्षांनी पुनरागमन
(Sunil Chetri Becomes First Indian to Hit More International Goals than Leonal Messi)