लिओनल मेस्सीशी तुलनेवर सुनील छेत्रीने दिली प्रतिक्रिया, म्हणाला ज्यांना फुटबॉलबद्दल माहिती आहे ते जाणतात की…

सध्या सक्रिय खेळाडूंमध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक गोल करण्यात छेत्री मेस्सीच्या पुढे गेला आहे. फिफा विश्वचषकाच्या क्वॉलीफायर सामन्यात बांग्लादेशला 2-0 ने नमवताना छेत्रीने केलेले दोन गोल महत्त्वाचे ठरले.

लिओनल मेस्सीशी तुलनेवर सुनील छेत्रीने दिली प्रतिक्रिया, म्हणाला ज्यांना फुटबॉलबद्दल माहिती आहे ते जाणतात की...
मेस्सी आणि छेत्री
Follow us
| Updated on: Jun 09, 2021 | 7:20 PM

मुंबई : भारतीय फुटबॉल संघाचा (Indian Football Team) कर्णधार सुनिल छेत्रीने (Sunil Chetri) काही दिवसांपूर्वी झालेल्या फिफा विश्वचषकाच्या क्वॉलीफायर सामन्यात बांग्लादेशला 2-0 ने नमवताना दोन महत्त्वाचे गोल केले. या दोन गोल्समुळे आंतरराष्ट्रीय सामन्यांत केलेल्या छेत्रीच्या गोल्सची संख्या 74 झाली. ज्यामुळे छेत्री मेस्सीला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. मेस्सीच्या नावावर सध्या 72 गोल्स आहेत. दरम्यान छेत्रीच्या या कामगिरीमुळे सर्व भारतीय त्याचे कौतुक करु लागले मेस्सी सोबत त्याची तुलना होऊ लागली. या तुलनेवर बोलताना छेत्रीने मेस्सी आणि माझ्यात तुलना होऊच शकत नाही. ही तुलना निरर्थक आहे असंही म्हणाला. (Sunil Chettri Says There is No Comparison Between Footballer lional Messi And Me)

या तुलनेवर बोलताना छेत्री म्हणाला, ”ही तुलना करणं लोकांची मर्जी आहे. त्यांच्या दृष्टीने ते ठिक असेल. पण सत्य परिस्थितीत माझी आणि मेस्सीची काहीच तुलना नाही होऊ शकत. माझ्यापेक्षा 1000 चांगले खेळाडू जगात आहेत जे स्वत: मेस्सीचे फॅन्स आहेत आणि हेच सत्य आहे असं छेत्री म्हणाला.” तसंच, “मला फुटबॉलबद्दल माहिती आहे त्यामुळे मी जाणतो अशी कोणतीच तुलना होऊ शकत नाही. हो पण मी भारतासाठी 100 सामने खेळलो याचा मला अभिमान आहे.”

‘पाच सेकंदासाठी खुश व्हा’

छेत्रीने तुलना करणाऱ्यांना तुम्ही हवंतर पाच सेकंदासाठी खुश होऊ शकता असा सल्ला दिला. ‘आंतरराष्ट्रीय गोल्सचा चार्ट पाहून मी मेस्सीच्या पुढे आहे हे पाहिल्यानंतर आनंदी होणाऱ्यांनी पाच सेकंद खुश रहा आणि पुढचा विचार करायला घ्या.’ असं छेत्री म्हणाला.

छेत्रीची धडाकेबाज कामगिरी

भारतीय संघात 2004 मध्ये पदार्पणानंतर छेत्रीने पहिला गोल कंबोडिया विरोधात 2007 मध्ये केला. आतपर्यंत छेत्री 117 सामने खेळला असून त्यात त्याने 74 गोल लगावले आहेत. सध्या छेत्री भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू असून कर्णधारपदाची धुरा एकहाती सांभाळतो. सध्या देखील 2022 फिफा विश्वचषकाचे क्वॉलीफायर सामने सुरु आहेत ज्यात छेत्री भारतीय संघाला जिंकवून देण्यासाठी जीवाचं रान करत आहे. त्याने सोमवारी देखील बांग्लादेशविरोधात 79 आणि 92 व्या मिनिटाला गोल करत सामना जिंकवून दिला.

हे ही वाचा –

भारतीय फुटबॉलपटूची कमाल, गोल्समध्ये मेस्सीला मागे टाकलं

तिन्ही लीगमध्ये रोनाल्डोचाच डंका! इंग्लंड, स्पेन गाजवल्यानंतर आता इटलीतही रोनाल्डोची यशस्वी वाटचाल

देशाला वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी 39 वर्षीय खेळाडू मैदानात, निवृत्तीच्या 5 वर्षांनी पुनरागमन

(Sunil Chettri Says There is No Comparison Between Footballer lional Messi And Me)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.